भारतीय क्रिकेट संघाकडून युवराज सिंगने 2007 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत एकाच षटकात 6 षटकार मारून नवा इतिहास रचला होता. त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकले. आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम गाजला आहे. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेल्या युवा फलंदाज प्रियांश आर्यने एकाच षटकात सहा षटकार मारून इतिहास रचला आहे. साऊथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना प्रियांश आर्यने एकाच षटकात सलग सहा षटकार मारून आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले आहे.
एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम अनेक भारतीय फलंदाजांनी केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध हा मोठा विक्रम केला होता. याशिवाय रवी शास्त्री आणि ऋतुराज गायकवाड यांनीही एका षटकात सहा षटकार मारले आहेत. मात्र, या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे.
आता या यादीत प्रियांश आर्यचे नावही जोडले गेले आहे. दिल्ली प्रीमियर लीगच्या 23व्या सामन्यात प्रियांशने उत्तर दिल्लीविरुद्ध जबरदस्त खेळी केली. यावेळी त्याने मनन भारद्वाजविरुद्ध एकाच षटकात 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
🚨 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝 𝐀𝐥𝐞𝐫𝐭 🚨
A 23-year-old Priyansh Arya smashes 6 sixes in an over in the inaugural season of the Delhi Premier League! 🤯💥#PriyanshArya #DPL2024 #Sportskeeda #SouthDelhiSuperstarz pic.twitter.com/XnuVBDOQk7
— Sportskeeda (@Sportskeeda) August 31, 2024
THE AYUSH BADONI SHOW IN DPL. 🥶
– 165 (55) with 8 fours and 19 sixes with a Strike Rate of 300. 🤯pic.twitter.com/C8IDUpNSoM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 31, 2024
दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळणाऱ्या प्रियांश आर्यने डावाच्या 12व्या षटकात 6 चेंडूंचा सामना केला आणि 6 षटकार ठोकले. दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात प्रियांश आर्यने शानदार फलंदाजी केली. आणि षटकार ठोकत शतक पूर्ण केले. प्रियांश (120) आणि आयुष बडोनी (165) यांच्या झंझावाती खेळीमुळे दक्षिण दिल्लीच्या संघाने 308 धावांची मजल मारली.
हेही वाचा-
यॉर्कर टाकणाऱ्या सर्वात धोकादायक गोलंदाजांची यादी समोर; दोन भारतीयांचा समावेश
या शॉर्ट बॉलचं करावं तरी काय! श्रेयस अय्यरची जुनी समस्या पुन्हा एकदा उघड
16 चेंडूत 33 धावा, सीएसकेच्या फलंदाजाची झंझावाती खेळी; संघाचा दमदार विजय