पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यतपद टेबल टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात अव्वल मानंकीत ईशा जोशी व आदर्श गोपाळ या जोडीने दुस-या मानांकीत वैभव दहीभाते व पूर्वा सोहोनी यांचा 11/3,9/11,11/7,11/7 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या गटात अतितटीच्या झालेल्या सामन्यात नवव्या मानांकीत गौरव लोहपत्रेने अव्वल मानांकीत शौनक शिंदेचा 9/11,11/5,11/6,12/10,6/11,9/11,11/3 असा संघर्षपुर्ण पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीयश भोसले, करण कुकरेजा, आरुष गलपल्ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
18 वर्षीखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकीत पृथा वर्टीकरने आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करत आठव्या मानांकीत श्रुती गभानेचा 11/5,11/9,9/11,11/5,11/9 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रीती गाढवे, मृण्मयी रायखेलकर व स्वप्नाली नराळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
महिलांच्या गटात बिगर मानांकीत नेहा महांगडे हीने दुस-या मानांकीत सलोनी शहा हीचा 11/7,11/8,11/6 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तर ईशा जोशी, स्वप्नाली नारळे, वेदिका भेंडे, फौजिया मेहेरली, वैभवी खेर, प्रितिका सेनगुप्ता यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
मिश्र दुहेरी: उपांत्य फेरी:
ईशा जोशी/आदर्श गोपाळ(1)वि.वि.उपेंद्र मुळ्ये/नेहा महांगडे 7/11,11/8,11/8,11/7
वैभव दहीभाते/पूर्वा सोहोनी(2)वि.वि.इकबाल मेहेरली/फौजिया मेहेरली 11/3,11/8,11/8
मिश्र दुहेरी: अंतिम फेरी:
ईशा जोशी/आदर्श गोपाळ(1)वि.वि. वैभव दहीभाते/पूर्वा सोहोनी(2) 11/3,9/11,11/7,11/7
18 वर्षाखालील-मुले उपांत्यपुर्व फेरी
गौरव लोहपत्रे(9)वि.वि.शौनक शिंदे(1)9/11,11/5,11/6,12/10,6/11,9/11,11/3
श्रीयश भोसले(4)वि.वि.आदर्श गोपाळ(5)11/4,11/9,11
करण कुकरेजा(3)वि.वि.अनय कोव्हेलमुडी(6)11/7,11/4,5/11,11/8,11/3
आरुष गलपल्ली(2)वि.वि.आर्यन पानसे(10)5/11,11/7,11/6,11/7,11/4
18 वर्षाखालील मुली- उपांत्यपुर्व फेरी
पृथा वर्टीकर(1)वि.वि.श्रुती गभाने(8)11/5,11/9,9/11,11/5,11/9
प्रीती गाढवे(4)वि.वि.अनिहा डिसुझा(5)11/6,7/11,11/9,5/11,11/7,11/9
मृण्मयी रायखेलकर(3)वि.वि.अंकिता पटवर्धन(6)12/10,11/6,11/8,9/11,11/9
स्वप्नाली नराळे(2)वि.वि.पूजा जोरवार(7)11/6,11/4,11/3,13/11
महिला एकेरी गट: उप-उपांत्यपूर्व फेरी:
ईशा जोशी(1)वि.वि.सुहासिनी बाकरे 11/2,14/12,11/8
स्वप्नाली नारळे(8)वि.वि.पूर्वा सोहोनी(9) 11/9,8/11,11/9,11/6
वेदिका भेंडे(12)वि.वि.शुभदा चोंदेकर(5) 11/9,9/11,11/5,11/5
फौजिया मेहेरली(3)वि.वि.चाओबा थोउंजाम 11/4,11/6,11/7
वैभवी खेर(11)वि.वि.सिद्धी आचरेकर(6) 11/6,11/7,11/7
प्रितिका सेनगुप्ता(7)वि.उज्वला गायकवाड(10) 8/11,13/11,14/12,11/13,11/6
नेहा महांगडे वि.वि.सलोनी शहा(2) 11/7,11/8,11/6.
पुरुष एकेरी गट: पहिली फेरी:
भूषण पुजारी वि.वि.सागर पटनायक 11/8,11/6,11/8
योगेश नाडगौडा वि.वि.जितेंद्र खासनिस 8/11,11/9,11/1,11/4
अनिकेत बोकील वि.वि.सचिन सुद्रीक 11/3,11/7,14/12
निखिल मनचंदा वि.वि.गजानन सावंजी 4/11,11/6,11/8,12/10
मिथिलेश पंडित वि.वि.रवी शेठ 11/5,11/8,12/10
अभिषेक बाजपेयी वि.वि.पार्थ खंडेलवाल 11/2,11/7,11/1
शुभम पहाडे वि.वि.रोहिदास गरुड 11/9,11/13,10/12,11/8,11/7
अमित क्षत्रिय वि.वि.सिद्धार्थ राऊत 11/5,14/12,11/6
तेजस धावडे वि.वि.पुल्केश गुणेचा 11/7,8/11,11/7,11/6
सागर कुलकर्णी वि.वि.प्रमोद मरकळे 11/9,11/3,11/8
नचिकेत देशपांडे वि.वि.सुजित प्रधान 8/11,11/6,11/7,18/16
रौनक आपटे वि.वि.विलास पळशीकर 11/5,11/4,11/5
ओंकार कडूकर वि.वि.पुष्कर परले 11/7,11/9,11/3
गुरू नाडगौडा वि.वि.संजय पटेल 11/3,11/9,11/6
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक
–एशियन गेम्स: नेमबाज संजीव राजपूतने भारताला मिळवून दिले आठवे पदक
–एशियन गेम्स: सिपॅक टॅकराॅवमध्ये भारताने मिळवले पहिले ऐतिहासिक पदक