भारतीय क्रिकेट संघ टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. रवी शास्त्री यांच्या जागेवर भारताचा माजी कर्णधार व सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद सांभाळणारा राहुल द्रविड याची नियुक्ती केली गेली आहे. त्याचवेळी राहुल द्रविडने काही दिवसांपूर्वी भारताच्या पुढील कर्णधाराविषयी महत्त्वाचे व्यक्तव्य केले होते.
हा असावा भारताचा कर्णधार
राहुल द्रविडने काही दिवसांपूर्वी भारताच्या पुढील कर्णधाराविषयी बोलताना म्हटले होते,
“मर्यादित षटकांच्या पुढील कर्णधाराविषयी विचाराल तर मी रोहित शर्माचे नाव घेईल. त्याच्याबरोबर केएल हा देखील चांगला पर्याय आहे.”
विराट कोहलीने टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्यापासून रोहित व राहुलसह श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांच्या नावाची पुढील कर्णधार म्हणून चर्चा होत आहे. भारतीय संघ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारू न शकल्यास विराटला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून देखील पायउतार व्हावे लागू शकते.
रोहितने दिली अशी प्रतिक्रिया
राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले,
“भारतीय संघामध्ये वेगळ्या भूमिकेत आल्याबद्दल द्रविड यांचे स्वागत व अभिनंदन. आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत. ते भारतीय क्रिकेटचे दिग्गज आहेत व भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे चांगले राहील.”
प्रशिक्षक म्हणून शानदार कामगिरी
राहुल द्रविड हे मागील सात वर्षांपासून भारत अ, भारतीय एकोणीस वर्षाखालील संघ व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक अशा विविध पदांवर कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या द्वितीय श्रेणीच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
तू खिंच मेरी फोटो! चौकार मारल्यानंतर स्कॉटिश फलंदाजाची ऍक्शन पाहून बोल्टने काढला फोटो -Video
अखेर बीसीसीआयला आली जाग, सुरू केला हार्दिकच्या पर्यायी खेळाडूचा शोध; ‘या’ अष्टपैलूंवर नजर