---Advertisement---

बंगळुरुमध्ये घडलेल्या घटनेवर द्रविड यांची भावुक प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले?

Rahul-Dravid
---Advertisement---

भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangaluru) संघाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये झालेल्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर सेलिब्रेशन दरम्यान जी घटना घडली, त्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी या घटनेला खूप दुःखद म्हटले आहे. ही घटना मागच्या बुधवारी बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम आणि त्याच्या आजूबाजूला घडली होती. जिथे एकूणच 2.5 लाख चाहते जमा झाले होते. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तसेच 56 लोक जखमी सुद्धा झाले.

भारताचे माजी प्रशिक्षक आणि कर्णधार राहुल द्रविड यांनी एनडीटीव्ही सोबत बातचीत करताना म्हटले, हे खूप निराशाजनक आहे. लोकांविषयी संवेदना व्यक्त करताना ते पुढे म्हटले, शहराच्या खेळातील संस्कृतीला बघता ही घटना खूप वेदनादायक आहे. हे शहर खेळा प्रती खूप उत्साहीत आहे. मी सुद्धा तिथूनच येतो. लोक आपल्या खेळावर प्रेम करतात. फक्त क्रिकेटवर नाही, शहरातील लोक खेळावर प्रेम करतात आणि येथील सर्व खेळांना ते फॉलो करतात. मग फुटबॉल संघ, असो किंवा कबड्डी संघ.

द्रविड यांनी आरसीबीच्या लोकप्रियतेवर सुद्धा जोर देत म्हटले आणि आरसीबी संघाचे खूप चाहते आहेत आणि जे काही झाले ते खूप दुर्भाग्याचे आहे. आमच्या सर्वांच्या संवेदना त्या सर्व लोकांसोबत आहेत, ज्यांच्या घरातील लोक गेले आहेत किंवा दुखी झाले आहेत.

या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष एस जयराम यांनी या घटनेची जबाबदारी घेत त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्येच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना 6 जून रोजी पोलिसांनी अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---