भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीच्या झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला २-० ची आघाडी घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी अप्रतिम खेळी केली होती. अशीच कामगिरी ते दुसऱ्या सामन्यात देखील करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या दोन्ही संघातील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यातील ड्रीम ११ संघ.
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएल राहुल, रिषभ पंत, ईशान किशन, युझवेंद्र चहल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, टॉड ऍशले, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, काईल जेमिसन, ईश सोधी, टिम साऊदी (कर्णधार), ॲडम मिल्ने.
अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हेन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सिफर्ट (यष्टिरक्षक), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), टॉड ऍशले, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
असा असू शकतो भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यासाठी ड्रीम ११ संघ
यष्टिरक्षक – टीम सिफर्ट, रिषभ पंत
फलंदाज – रोहित शर्मा, मार्टिन गप्टील, केएल राहुल
अष्टपैलू खेळाडू – जिमी नीशम, डॅरील मिशेल
गोलंदाज – ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, अक्षर पटेल, हर्षल पटेल
कर्णधार – रोहित शर्मा
उपकर्णधार – ट्रेंट बोल्ट
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड संघातील दुसऱ्या टी२० सामन्यासाठी प्रेक्षकांची १०० टक्के उपस्थिती, पण ‘ही’ आहे अट
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत-न्यूझीलंड दुसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर