आयपीएल २०२१ स्पर्धेचा ५० वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात गुरू आणि शिष्य आमने सामने येणार आहेत.
या दोन्ही संघांची आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरी पाहायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ९ सामने जिंकून १८ गुणांसह हा संघ पहिल्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने देखील या स्पर्धेत आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये या संघाला ९ सामने जिंकण्यात यश आले आहे. हा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया,चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असू शकतो?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सोमवारी (२ ऑक्टोबर), भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे.
या सामन्यासाठी असा असू शकतो दिल्ली कॅपिटल्स संघाचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
रिषभ पंत ( कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, ललित यादव, आर अश्विन, आवेश खान, एन्रीच नॉर्किए आणि कागिसो रबाडा
या सामन्यासाठी असा असू शकतो चेन्नई सुपर किंग्स संघाचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
एमएस धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), फाफ डू प्लेसिस,ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, सॅम करण, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूड
या सामन्यात हे ११ खेळा़डू असू शकतात ‘ड्रीम ११’ संघात
यष्टीरक्षक – रिषभ पंत
फलंदाज – शिखर धवन, श्रेयस अय्यर, फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड
अष्टपैलू खेळाडू – अक्षर पटेल, सॅम कारण
गोलंदाज – जोश हेजलवूड, आवेश खान, एनरीक नॉर्खिया, शार्दुल ठाकूर
कर्णधार – ऋतुराज गायकवाड
उपकर्णधार – शिखर धवन
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादविरुद्ध विजयानंतर दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…
एफसी गोवाने जिंकला ऐतिहासिक ड्युरंड कप; कर्णधार बेदिया ठरला अंतिम सामन्याचा नायक
आरसीबीविरुद्ध तळपतेच राहुलची बॅट; असा कारनामा करणारा आहे एकमेव फलंदाज