इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा पहिला क्वालिफायर सामना रविवारी (१० ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. दिल्ली संघ २० गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये स्थान न मिळवू शकलेल्या चेन्नईने या वर्षी पुन्हा स्थान मिळवले आहे. हा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
चेन्नई संघाने १२ आयपीएल हंगामामध्ये भाग घेतला आहे, त्यात त्यांचा संघ ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्यापैकी चेन्नईचा संघ आतापर्यंत ८ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे, त्यापैकी ३ वेळा त्यांनी जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे दिल्लीने सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आहे.
दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कोना भरतने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून दिल्लीला अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात जोरदार धक्का दिला. तर, चेन्नईला पंजाब किंग्सविरुद्ध पराभूत झाले.
आता पहिल्या क्वालिफायर सामन्यातून या दोन्ही संघांना अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी असणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो १५ ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असेल?
या सामन्यासाठी हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम ११ संघात
यष्टीरक्षक: रिषभ पंत
फलंदाज: ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, शिखर धवन, श्रेयस अय्यर
अष्टपैलू: ड्वेव ब्राव्हो, मोईन अली, मार्कस स्टोयनिस
गोलंदाज: शार्दुल ठाकूर, एनरिक नोर्किया, दीपक चहर
या सामन्यासाठी या खेळाडूंमधून निवडले जातील ११ जणांचे संघ
चेन्नई सुपर किंग्ज: एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर, एन जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, आर साई किशोर, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरी निशांत.
दिल्ली कॅपिटल्स: रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, एन्रीच नॉर्किए, अवेश खान, बेन द्वारशुईस, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया , लुकमन मेरीवाला, प्रवीण दुबे, टॉम कुरान, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्स आणि विष्णू विनोद.
या सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, क्वालिफायर १
दिनांक – १० ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकातील सर्व १६ संघ होणार मालामाल! आयसीसीकडून बक्षीस रकमेची घोषणा
मॅक्सवेलवरील १४.२५ कोटींची बोली आरसीबीसाठी ठरली फायद्याची, ऑसी ऑलराउंडरने ८ हंगामांची कसर काढली भरुन






