भारत सरकारने ऑनलाइन गेमिंगसंबंधी नवा कायदा जाहीर केल्यानंतर ड्रीम 11सह सर्व ‘रिअल मनी गेम्स’वर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर खेळाडूंना ड्रीम 11 वर पैसे लावणे शक्य नव्हते आणि फक्त फ्री कॉन्टेस्ट्स आयोजित केले जात होते. मात्र, यामुळे ड्रीम 11 ला काहीच फायदा झाला नाही, उलट कंपनीला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. आता त्यांनी पुन्हा मार्केटमध्ये दमदार पुनरागमन करत मोठ्या प्रमाणात पैसा कमावण्याचा प्लान आखला आहे. भारतात बंदी लागल्यानंतर ड्रीम 11 ने मोठं पाऊल उचललं आहे.
आता भारतात खेळाडू पैसे लावून लाखोंची बक्षिसे जिंकू शकणार नाहीत. ड्रीम 11 ची सुमारे 95% कमाई मनी कॉन्टेस्टमधून होत होती. भारतात बंदी लागल्यानंतर कंपनीने आपले ॲप जागतिक स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, यूकेसह 11 वेगवेगळ्या देशांमध्ये ड्रीम 11 लाँच करण्यात आले आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू टीम तयार करून लाखो-कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकू शकतील. मात्र, भारतीय चाहत्यांना सध्या फक्त फ्री कॉन्टेस्टमध्येच भाग घ्यावा लागणार आहे.






