जगातील सर्वात सुप्रसिद्ध क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत विजयी सुरुवात केली. या विजयात युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला शून्यावर त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर आता आवेशने धोनीला बाद केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या सामन्यात मिळाली संधी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारा युवा वेगवान गोलंदाज आवेश खान मागील चार वर्षापासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. २०२१ आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ईशांत शर्मा व उमेश यादव यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेल्या गोलंदाजांऐवजी युवा कर्णधार रिषभ पंतने आवेशला संधी दिली होती. आवेशने कर्णधार व संघ व्यवस्थापनाला निराश न करता पहिल्या सामन्यात दोन बळी मिळवले. त्याने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर फाफ डू प्लेसीसला तर तिसऱ्या षटकात दिग्गज एमएस धोनीला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला.
स्वप्न पूर्ण झाले
एमएस धोनीला बाद केल्यानंतर आवेश खान भलताच खूश दिसला. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटर हँडलवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आवेश प्रतिक्रिया देताना म्हटला, “माही भाईला बाद करणे माझे स्वप्न होते. तीन वर्षांपूर्वी मी त्याला बाद करण्याच्या अगदी जवळ आले होतो. मात्र, त्यावेळी क्षेत्ररक्षक त्याचा झेल घेऊ शकला नव्हता.”
आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात आवेशच्या गोलंदाजीवर कॉलीन मुन्रोने धोनीचा झेल सोडला होता.
आवेशनेया व्हिडिओमध्ये पुढे म्हटले, “माही भाईला बाद करणे आमच्या योजनेचा भाग होता. तो अनेक दिवसांपासून खेळला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर दबाव टाकता येणार होता आणि त्यातच आम्ही त्याला बाद करण्यात यशस्वी ठरलो.”
He made the ball do talking and rose to the occasion 💙
📹 | Avesh Khan chats with us about his performance in #CSKvDC, getting the big wickets of Faf and MSD, and if DC has the best pace attack in the IPL 🔥#YehHaiNayiDilli #IPL2021 #CapitalsUnplugged @OctaFX @TajMahalMumbai pic.twitter.com/nxwPodlWtq
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 11, 2021
आवेशने दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्किए, ईशांत शर्मा व उमेश यादव हे अनुभवी गोलंदाज संघात आहेत. तसेच यांना पर्याय म्हणून आवेश खान, ख्रिस वोक्स उपलब्ध असून फिरकी गोलंदाजी विभागात रविचंद्र अश्विन, अमित मिश्रा व अक्षर पटेल हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिरकीपटू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरच्या फलंदाजांची वाढली धडधड, हार्दिक पंड्या येत्या सामन्यात गोलंदाजीस सज्ज?
रैना-रायुडूचा नवा अवतार! सीएसकेच्या खेळाडूंना खाऊ घातली बिर्याणी, पाहा व्हिडिओ