इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजी देण्यात आली नव्हती. आता मुंबई संघाच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट असोसिएशन जहीर खान याला विश्वास आहे की हार्दिक लवकरच गोलंदाजी करताना दिसेल.
बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिकने फलंदाजी करताना १० चेंडू खेळत १३ धावा केल्या होत्या. परंतु त्याला गोलंदाजी देण्यात आली नव्हती. या सामन्यानंतर त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. त्यानंतर आता जहीर खानने याबाबत खुलासा करत म्हटले आहे की, “पंड्याच्या कामाचे ओझे लक्षात घेऊन त्याला गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी भारतीय संघाला अनेक महत्त्वपूर्ण मालिका खेळायच्या आहेत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “हार्दिक संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्यावर कामाचे ओझे येऊ नये म्हणून त्याला पहिल्या सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी दिली नाही. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत ९ षटक गोलंदाजी केली होती. हार्दिकची तंदुरुस्ती संघासाठी चिंतेचा विषय होती. परंतु तो लवकरच गोलंदाजी करताना दिसणार आहे. तो गोलंदाजी केव्हा करेल याबाबत फिजियो निर्णय घेणार आहेत.”
मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना उद्या (१३ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपला पहिला सामना जिंकला आहे. तर मुंबईने पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रैना-रायुडूचा नवा अवतार! सीएसकेच्या खेळाडूंना खाऊ घातली बिर्याणी, पाहा व्हिडिओ