क्रिकेट सामन्यादरम्यान आपण खेळाडूंना मैदानात पाणी घेऊन येताना बऱ्याचदा पाहिले आहे किंवा कधीतरी एखादी छोटी गाडी पाणी घेऊन मैदानात येते. पण इंग्लंडमधील एका सामन्यात चक्क रिक्षा पाणी घेऊन आली.
ही घटना रिचमंड क्रिकेट क्लब मैदानावर एका क्लबच्या क्रिकेट सामन्यात घडली. हा व्हिडिओ भारत आर्मीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सामना द बार्मी आर्मी विरुद्ध द भारत आर्मी यांच्या दरम्यान झाला होता.
द भारत आर्मीने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “खेळाडूंना पाणी देण्याचा नवीन मार्ग”
#ENGvIND Are you taking taking notes @BCCI ? A new way of delivering ‘drinks’ for the the players… #BharatArmyRickshaw #BharatArmy #Rickshaw #Cricket #IndianCricket #TeamIndia #LoveCricket #ViratKohli #COTI 🇮🇳@imVkohli pic.twitter.com/v8M0nEa5Uw
— The Bharat Army (@thebharatarmy) August 6, 2018
द भारत आर्मी हा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक ग्रुप असून हे चाहते भारतीय संघाच्या सामन्यांसाठी परदेशात प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडीयममध्ये उपस्थित असतात.
सध्या ते भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील सामन्यांना उपस्थित राहुन भारतीय संघाला पाठिंबा देत आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू
–ज्या खेळाडूवर टीम इंडियाची सर्व भिस्त आहे तोच खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार!
–Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता