अायपीएलच्या ११व्या पर्वात डीअारएस (Decision Review System) पद्धत वापरली जाणार अाहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याबद्दलचा निर्णय घेतला आहे.
डीअारएसला मोठा विरोध करणारे क्रिकेट मंडळ अशी ओळख असणाऱ्या बीसीसीअायने २०१६मध्ये प्रथमच या पद्धतीचा वापर केला होता. इंग्लंड संघाने तेव्हा भारत दौरा केला होता तेव्हा ह्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता.
आता अायपीएलच्या ११व्या पर्वात ही पद्धत वापरली जाणार असल्यामुळे बीसीसीअाय एकप्रकारे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ही पद्धत स्विकारली असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी बीसीसीअायने पंचांचे एक कार्यशाळा विझाग येथे आयोजीत केली होती. त्यात त्यांना डीअारएसचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे पंच अायपीएलच्या ११व्या पर्वात काम पाहणार आहेत.
डीअारएसचा अवलंब करणारी पाकिस्तान सुपर लीग जगातील पहिली क्रिकेट लीग होती.