---Advertisement---

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंडच्या दुसर्‍या कसोटीत मद्यधुंद प्रेक्षकांचा गोंधळ, मैदानाचे कर्मचारी झाले जखमी

On: शनिवार, जून 12, 2021 7:47 PM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांमध्ये सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत असून दुसरा कसोटी सामना परवापासून म्हणजेच १० जूनपासून खेळवला जात आहे. बर्मिंगहॅम येथील एजबस्टनच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. हा सामना दोन्ही संघातील खेळाडूंच्या लक्षवेधी खेळामुळे चर्चेत आहे. मात्र तिसर्‍या दिवशी एका अप्रिय घटनेमुळे देखील हा सामना चर्चेत आला.

सामन्या दरम्यान मैदानात उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. नशेत असलेल्या या प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी मैदानातील काही कर्मचारी सरसावले होते. मात्र प्रेक्षकांच्या गोंधळाचा त्यांनाही फटका बसला असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

दोन कर्मचारी झाले जखमी
खरंतर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अनेक दिवस मैदानात प्रेक्षकांना येण्यास बंदी होती. मात्र हळूहळू हा प्रभाव ओसरू लागल्याने इंग्लंडने पहिल्यांदाच न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली. पहिल्या लॉर्डस कसोटीत मैदानाच्या क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना मैदानात येण्याची अनुमती होती. तर एजबस्टन कसोटीत ही क्षमता वाढवून ५० टक्के करण्यात आली होती. अर्थात केवळ १६ वर्षांवरील व्यक्तींना प्रवेशाची अनुमती होती. मात्र दीर्घकाळानंतर ही अनुमती मिळाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता प्रेक्षकांच्या गोंधळामुळे या आनंदाला काहीसे गालबोट लागले आहे.

इंग्लंडमधील एका प्रमुख वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मैदानाचे दोन कर्मचारी या गोंधळात जखमी झाले. यातील एका जखमी कर्मचाऱ्याने केलेल्या खुलाशानुसार या मद्यधुंद प्रेक्षकांना काबूत आणताना त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला त्यांनी विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्या दोघांनाही जखम झाली. हे प्रेक्षक उपस्थित असलेल्या स्टँडमधील इतरही अनेक प्रेक्षक मद्यधुंद अवस्थेत होते, मात्र उर्वरित मैदानातील वातावरण चांगले होते, अशीही माहिती त्या कर्माचाऱ्याने दिली. दरम्यान, याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

चहल करणार ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूचा सामना, मात्र क्रिकेट नाही तर चक्क बुद्धिबळाच्या पटावर

Video: पाकिस्तानी गोलंदाजाचा सामना करताना आंद्रे रसल जखमी; स्ट्रेचरवरुन न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये

WIvSA: क्विंटन डी कॉकचे वादळी शतक, दक्षिण आफ्रिका दुसर्‍या दिवसाखेर मजबूत स्थितीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---