2019 ला होणाऱ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद दुबईला मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या दुबईत कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु आहे.
29 जूनला दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेचा मुख्य अजेंडा दुबईला चौथ्या विश्वचषकाचे यजमानपद देण्याचा आहे.
याविषयी आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जनार्दन सिंग गेहलोत यांनी सांगितले की दुबईत कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्दिष्ट 2019चा विश्वचषकाचे आयोजन हे होते.
पण त्याचबरोबर त्यांनी दुबईलाच यजमान पद मिळेल याबाबत अनिश्चितता दर्शवली.
ते पुढे म्हणाले, ” पहिले तिनही विश्वचषक भारतात पार पडले आहेत. आमची खेळाचा प्रसार व्हावा अशी इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ही स्पर्धा (दुबई कबड्डी मास्टर्स) आयोजित केली. विश्वचषकाच्या तारखा आणि स्थळाची अजून घोषणा झालेली नाही. आम्ही येथील काही साधक बाधक गोष्टींचे मुल्यांकन करत आहोत.”
गेहलोत पुढे असेही म्हणाले की “मी इथे तर्कवितर्क सांगायला आलेलो नाही. ज्यावेळी स्थळ आधिकृत होईल तेव्हा मी त्याबद्दल घोषित करेल.”
अर्जेंटिना कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रिकार्डो अकुना यांनीही दुबईला विश्वचषकाचे यजमानपद मिळण्याची दाट शक्यता असल्याची हिंट दिली.
ते म्हणाले, यावर चर्चा होईल. त्याचबरोबर कबड्डी दुबई मास्टर्स स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांकडूनही आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन अभिप्राय घेईल. दुबईला यजमानपद मिळण्याची शक्यता आहे. पण याबद्दल 29 जूनलाच निर्णय होईल.
अकुना पुढे म्हणाले, पुढील विश्वचषकात तीन लॅटीन अमेरिकन संघ सहभागी होणार आहेत. मेक्सिको आणि कोलंबिया हे संघ सहभागी होतील. ही खेळासाठी चांगली गोष्ट आहे. आम्हाला आशा आहे आम्ही आंतरराष्ट्रीय स्थरावर विजयाची चव चाखू.
तसेच गेहलोत शेवटी म्हणाले, आॅलिम्पिकमध्येही कबड्डीला आणण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत.
कबड्डीचा पहिला विश्वचषक 2004ला मुंबईत, दुसरा विश्वचषक 2007ला पनवेलमध्ये पार पडला होता. तर मागचा विश्वचषक अहमदाबादला 2016मध्ये पार पडला आहे.
महत्तवाच्या बातम्या:
–महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगाने दुबई मास्टर्स स्पर्धेत केले समालोचन
–कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताचा सलग दुसरा विजय, दुबईत रिशांक देवडिगा चमकला
–कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!