---Advertisement---

इराण-अमेरिका हल्ल्यांदरम्यान सौदी अरेबियामध्ये फसला दिग्गज क्रिकेटपटू, सोशल मीडियामार्फत दिली माहिती

On: रविवार, मार्च 1, 2026 4:04 PM
---Advertisement---

मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा अनेक देशांवर परिणाम होत आहे. अशातच बांग्लादेशचा अनुभवी विकेटकीपर-फलंदाज मुशफिकुर रहीम हा पण जेद्दाह विमानतळावर फसला आहे. इस्रायल-अमेरिका यांनी इराणवर क्षेपणास्त्रांनी (मिसाइल्स अकॅट) हल्ला केला. त्यानंतर वातावरण चिंताजनक बनले आहे. त्यामुळे अनेक देशांनी विमानतळ बंद केली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत.

रहीम मक्केला गेला होता. त्याचे दुबईमार्फत ढाकामध्ये परतण्याचे नियोजन होते. त्यासाठी त्याने एमिरेट्सची EK 0806 ची जेद्दाह ते दुबई प्रवास केला, मात्र युद्धामुळे ते विमान पुन्हा जेद्दाहकडे रवाणा झाले. त्याने फेसबुकमार्फत माहिती दिली. त्यामध्ये त्याने लिहिले, “मी काही दिवसांपूर्वी उमरा हजसाठी मक्का येथे आलो होतो. माझा हज पूर्ण झाला आणि आज दुबई (एमिरेट्स) मार्गे बांगलादेशला परतलो. आम्ही आज सकाळी जेद्दाहहून दुबईला EK 0806 ने उड्डाण केले पण दुर्दैवाने अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे सर्व विमाने जेद्दाहला परतली आहेत आणि आता मी हजारो प्रवाशांसह जेद्दाह एअरपोर्टमध्ये आहे. आम्ही इतर बांगलादेशी लोकांसह कधी आणि कसे ढाक्याला जाऊ शकू, याची चिंता आहे.”

रहीमची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मोठी राहिली आहे. त्याने बांग्लादेशसाठी १०० कसोटी, २७४ वनडे आणि १०२ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीमध्ये ६५१० धावा केल्या असून त्यात १३ शतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये ७७९५ धावा करताना ९ शतके आणि ४९ अर्धशतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १५०० धावा केल्या असून त्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

इराण-इस्रायल युद्ध मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. ते कालपासून (२८ फेब्रुवारी) पुन्हा सक्रिय झाले. यामुळे भारताच्या विमानवाहतुकीवरही त्याचा परिमाण झाला आहे. चेन्नई, बेंगलोरमधील उड्डाणे रद्द झाली आहे. तसेच एयर इंडियानेही आखाती देशांमधील उड्डाणे रद्द केली आहे. त्यामध्ये जेद्दाह, दोहा, दुबई, मस्कट, रियाद आणि तेल अवीव यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---