---Advertisement---

“जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगमुळे विकेट घेण्याच्या टिप्स मिळाल्या”, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचा खळबळजनक खुलासा

On: बुधवार, मार्च 4, 2026 6:17 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन याने नुकतेच एक मोठी माहिती उघड केली आहे. त्याने मागील वर्षीच्या कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीचा रिप्ले पाहिल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला होता. बुमराहच्या गोलंदाजीचा रिप्ले पाहून मी नक्क्ल केली आणि विकेट्स काढल्या, असे विधान यान्सेनने केले आहे.

यान्सेन म्हणाला, ” मी कोलकाताच्या पहिल्या कसोटीमधील जसप्रीत बुमराहची गोलंदाजी पाहिली आणि त्याच्या विकेट्सचे रिप्ले पाहिले. तेव्हा मला लक्षात आले की त्याच्या हातातील चेंडू खूप स्विंग होत होता. त्याने जसे केले तसे आपणही का करुन पाहू नये, असे मला वाटले.”

सध्या सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यान्सेनने या स्पर्धेच्या सराव सामन्यात बुमराहसारखी गोलंदाजी केली. त्याला चेंडू प्रत्यक्षात विकेटवरून वेगाने हलत आहे, असे दिसले. त्याने म्हटले, “वॉर्म-अप सामन्यात मी त्याच्यासारखीच गोलंदाजी केली आणि चेंडू खरचं वेगाने जात होता. हे मी पहिल्या सामन्यात करून पाहिले आणि लगेचच दोन विकेट्स घेतल्या.”

यामध्ये विशेष असे की दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये टी२० विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना आज (४ मार्च) खेळला जाणार आहे. हा सामना त्याच मैदानावर होणार ज्यावरील बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल यान्सेनने केली. ते म्हणजे कोलकाताचे ईडन गार्डन्स.

या स्पर्धेत यान्सेनची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने ५ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दक्षिण आफ्रिका या स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ ठरला आहे. त्यांनी एकही सामना गमावला नसून भारताला सुपर-८च्या सामन्यात पराभूत केले होते.

कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिकेला टी२० सामना खेळण्याचा अनुभव नाही. तसेच टी२० विश्वचषकात त्यांचा न्यूझीलंडविरुद्ध कामगिरी अतिउत्तम आहे. हे दोन संघ टी२० विश्वचषकात आतापर्यंत ५ वेळा समोरा-समोर आले असून त्यामध्ये सर्व सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---