भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील नव्या हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना बेंगलोर येथे खेळला जात आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण विभागाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली असून, ते निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दक्षिण विभागाचा वेगवान गोलंदाज विद्वत कवीरप्पा याने 4 बळी घेत आपल्या संघाला सामन्यात पुढे नेले आहे.
चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात पहिल्या दिवशी पश्चिम विभागाचा कर्णधार प्रियांक पांचाल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सर्वच गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा डाव केवळ 213 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पश्चिम विभागाचा फलंदाजीचा क्रम देखील चांगलाच ढासळला.
पश्चिम विभागासाठी सलामीवीर पृथ्वी शहा याने शानदार फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. त्याने 65 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांना सपशेल अपयश आले. उपांत्य सामन्यात शतक करणारा चेतेश्वर पुजारा 9, अनुभवी सूर्यकुमार यादव 8 व सर्फराज खान शून्यावर बाद झाला. अष्टपैलू शम्स मुलानी व अतीत सेठ हे देखील फार काळ टिकू शकले नाहीत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाने 7 बाद 129 धावा केल्या. दक्षिण विभागासाठी विद्वतने 4 तर विजय कुमारने 2 बळी टिपले. पश्चिम विभाग अद्याप 84 धावांनी पिछाडीवर असून, तिसऱ्या दिवशी आघाडी घेण्याचा दक्षिण विभाग प्रयत्न करेल.
मागील वर्षी खेळल्या गेलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. यावेळी या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न दक्षिण विभाग करेल.
(Duleep Trophy 2023 Final South Zone Took Lead After Day 2 Vidhwath Kaverappa Took Four Fer)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद