देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामातील पहिली स्पर्धा सध्या खेळली जात आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने शनिवारी (8 जुलै) समाप्त झाले. पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग असा झालेला पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पश्चिम विभागाने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दक्षिण विभाग विरुद्ध उत्तर विभाग या सामन्यात दक्षिण विभागाने दोन गडी राखून विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली.
South Zone Won by 2 Wicket(s) (Qualified) #SZvNZ #DuleepTrophy #SF2 Scorecard:https://t.co/sCmXap8nvj
— BCCI Domestic (@BCCIdomestic) July 8, 2023
चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पश्चिम विभाग व मध्य विभाग भिडले. गतविजेत्या पश्चिम विभागाने अतीत शेठ याच्या 74 धावांच्या जोरावर 220 धावा बनवल्या होत्या. मध्य विभागाचा कर्णधार शिवम मावी सहा बळी मिळवलेले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मध्य विभागाचा डाव अर्झान नागवासवाला व अतीत यांच्या गोलंदाजीच्या जोरावर केवळ 128 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा याने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने आपली आघाडी मोठी केली. पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 297 धावा केल्या. त्यामुळे मध्य विभागाला 395 धावांचे आव्हान मिळाले. मध्य विभागाची 4 बाद 128 अशी धावसंख्या असताना पाचव्या दिवशी पावसामुळे फारसा खेळ न झाल्याने पश्चिम विभागाला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी घोषित केले गेले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण विभाग व उत्तर विभाग आमनेसामने आले. या सामन्यात उत्तर विभागाने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण विभागाने 195 धावा उभारल्या. उत्तर विभागाने आपल्या दुसऱ्या डावात केवळ 211 धावा केल्याने दक्षिण विभागासमोर विजयासाठी 215 धावांचे ठेवले. दक्षिण विभागाने दोन गडी राखून विजय मिळवत, अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना 12 जुलै रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
(Duleep Trophy 2023 West Zone And South Zone Entered In Finals)
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा बर्थडे सेलिब्रेशनचा ‘माही वे’! आपल्या लाडक्या श्वानांसह साजरा केला वाढदिवस, पाहा क्युट व्हिडिओ
विश्वचषकापूर्वी OYO कंपनीने उचलले मोठे पाऊल, 10 शहरांमध्ये वाढवणार तब्बल ‘एवढे’ हॉटेल्स