---Advertisement---

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्मा झाला कर्णधार! भारतासाठी त्रिशतक झळकावणाऱ्या फलंदाजाचाही संघात समावेश

On: रविवार, ऑगस्ट 2, 2026 9:02 AM
---Advertisement---

भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा आगामी दुलीप ट्राॅफी (Duleep Trophy) स्पर्धेत ‘साउथ झोन’ संघाचे नेतृत्व करेल. आंध्रचा अनुभवी फलंदाज रिकी भुई याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या भारतीय संघात नसलेल्या करुण नायरनेही साउथ झोन संघात स्थान मिळवले आहे. याव्यतिरिक्त, ‘इंडिया ए’चा उदयोन्मुख फलंदाज एस.के. रशीद याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

कर्नाटकचा आर. स्मरण आणि हैदराबादचा के. हिमातेजा यांनाही संघात संधी देण्यात आली आहे. ‘इंडिया ए’चा माजी यष्टिरक्षक एन. जगदीसन हा देखील या संघाचा भाग आहे. श्रेयस गोपाल आणि के. साई तेजा यांनीही साउथ झोन संघात स्थान मिळवले आहे.

या वर्षातील भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात दुलीप ट्राॅफी स्पर्धेने होणार आहे. ही स्पर्धा 23 ऑगस्टपासून सुरू होईल आणि तिचा अंतिम सामना 10 सप्टेंबरपर्यंत खेळवला जाईल. यावर्षी दुलीप स्पर्धा तिच्या पारंपरिक ‘झोनल’ (प्रादेशिक विभाग) स्वरूपात परतत असून, यात एकूण सहा संघांचा समावेश असेल. सर्व सामने बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मैदानावर खेळवले जातील.

SOUTH ZONE दक्षिण विभागाचा संघ :

तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई (उपकर्णधार), अभिनव तेजराणा, एस. के. रशीद, के. हिमतेजा, आर. स्मरण, एन. जगदीशन, करुण नायर, टी. त्यागराजन, श्रेयस गोपाल, के. साई तेजा, टी. विजय, व्ही. कावेरीप्पा आणि अमन खान.

EAST ZONE पूर्व विभागाचा संघ :

ईशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घरामी, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, शाहबाज अहमद, सूरज सिंधू जयस्वाल, विराट सिंह, कुमार कुशाग्र, शिखर मोहन, शुभ्रांशू सेनापती, अभिजीत सरकार, अनुकूल रॉय, डॅनिश दास.

WEST ZONE पश्चिम विभागाचा संघ :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शम्स मुलानी (उपकर्णधार), हार्विक देसाई, उर्विल पटेल, जयमीत पटेल, पृथ्वी शॉ, शिवालिक शर्मा, सिद्धार्थ देसाई, सरफराज खान, मुशीर खान, अतीत शेठ, मुकेश चौधरी, तनुष कोटियान, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे.

CENTRAL ZONE मध्य विभागाचा संघ :

रजत पाटीदार (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), अमन मोखाडे, कुणाल चंदेला, यश राठोड, आयुष पांडे, आर्यन जुयाल, कुणाल सिंह राठौर, सारांश जैन, हर्ष दुबे, अर्शद खान, झीशान अन्सारी, आर्यन पांडे, यश ठाकूर आणि नकेत भूते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---