भारतीय संघला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पराभवला सामोरे जावे लागले आहे. मालिकेतील शेवटचा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा येथे खेळला गेला. टीम इंडिया पुन्हा एकदा लक्ष्याचा पाठलाग करायला कमी पडली. भारतीय फलंदाज परत एकदा लंकेच्या गोलंदाजांसमोर झगडताना पहायला मिळाले. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात देखील असेच पहायला मिळाले होते. शेवटच्या वनडे यजमान संघाने या सामन्यासह तीन सामन्याची वनडे मालिका 2-0 ने आपल्या नावे केले.
21 वर्षीय श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेलालगेचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. भारतीय संघाचे 5 फलंदाज त्याचे बळी ठरले. त्यात कर्णधार रोहित शर्माशिवाय शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव यांचा समावेश होता. वेललागेने 5.1 षटकांत 27 धावांत या 5 फलंदाजांना बाद केले.
दुनिथ वेलालगेचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दोनदा 5 बळी घेणारा तो जगातील पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरनसारखे दिग्गज फिरकीपटूही हे करू शकले नाहीत. गतवर्षी आशिया चषक स्पर्धेत याच मैदानावर वेलालगेने भारताविरुद्ध 40 धावांत 5 बळी घेतले होते. या लेफ्ट आर्म स्पिनरने 7 विकेट्स घेण्यासोबतच मालिकेत 108 धावाही केल्या.
श्रीलंकेने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर, श्रीलंकेच्या 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दुसरा सामना 32 धावांनी जिंकला, भारतीय संघाने आपल्या कारकिर्दीत प्रथमच वेललागे (27 धावांत पाच विकेट्स) जेफ्री वँडरसे (34 धावा) महिष तिक्षाना (45 धावांत दोन विकेट) च्या फिरकीच्या जादूसमोर 26.1 षटकांत 138 धावांत गुंडाळले.
हेही वाचा-
टीम इंडियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर श्रीलंकेला मोठा धक्का, फिरकी गोलंदाजावर फिक्सिंगचे आरोप!
शाहीन आफ्रिदीसोबत गेम झाला! बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी पीसीबीने दिला मोठा धक्का
मासिक पाळी असताना 111 किलो वजन उचललं! मीराबाई इतिहास रचण्यापासून थोडक्यात चुकली