RCB vs PBKS FINAL: यंदाच्या आयपीएल हंगामातील फायनल सामना आज (3 जून) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला जाणार आहे. (RCB vs PBKS) दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ ट्रॉफीसाठी जीवाचं रान करताना दिसतील. कारण 18 वर्षांच्या आयपीएल इतिहासात दोन्ही संघांनी अद्याप आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. या पार्श्वभूमीवर ड्युरेक्स इंडियाची कहर पोस्ट व्हायरल झाली आहे.
ड्युरेक्स इंडियाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 18 वर्षापासून दोन्ही वर्जिन आहेत. दरम्यान आजच्या रात्री कोण लकी ठरेल? अशी पोस्ट ड्यूरेक्स इंडियाने केली आहे. या पोस्टवर युजरकर्त्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत.
पंजाब आणि आरसीबी संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघ 36 वेळा आमने-सामने आले आहेत. यावेळी दोन्ही संघांची कामगिरी फिफ्टी-फिफ्टी राहिली आहे. आरसीबीने 18 तर पंजाबने 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच यंदाच्या आयपीएल हंगामात दोन्ही संघ 3 वेळा भिडले आहेत. दरम्यान आरसीबीचे वर्चस्व राहिले आहे. आरसीबीने 3 सामन्यात 2 विजय मिळवले तर पंजाबला केवळ एक सामना जिंकता आला आहे. (RCB vs PBKS Head To Head Records) असे असले तरीही फायनल सामन्यात कोण बाजी मारेल? हे पाहणे मनोरंजक ठरेल.






