---Advertisement---

दुर्गा एसएने सहज जिंकला सामना, तर संगम यंग बॉईज अन् एनडीए युथ स्पोर्ट्स क्लबचा संघर्षपूर्ण विजय

On: गुरूवार, मे 11, 2023 7:26 PM
Durga-S.A-Team
---Advertisement---

द्वितीय-तृतीय श्रेणी गटातील संघाच्या सुरु असलेल्या ऍस्पायर चषक 2023 स्पर्धेत दुर्गा एस.ए. संघाने सहज विजयासह आपली आगेकूच कायम राखली. त्याच वेळी संगम यंग बॉईज आणि एनडीए युथ स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी संघर्ष करावा लागला.

पिंपरी येथिल डॉ. हेडगेवार मैदानावर गुरुवारी (दि. 11 मे) झालेल्या सामन्यात संगम यंग बॉईज संघाने दोन्ही सत्रात एकेक गोल करताना हायलायडर्स एफसी संघाचे आव्हान 2-0 असे मोडून काढले. साहिल कदमने पूर्वार्धात 20व्या, विपुल गोफनेने उत्तरार्धात 45व्या मिनिटाला गोल केला.

दुसऱ्या सामन्यात दुर्गा स्पोर्टस अकादमी संघाने धीरज मानेच्या दोन गोलच्या जोरावर डिएगो ज्युनिअर्स एफसीए संघावर 4-0 असा मोठा विजय मिळविला. मयुर वाघिरेने 10व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर नेल्स पास्तेने 23व्या मिनिटाला दुसरा गोल करून आघाडी वाढवली. उत्तरार्धात धीरजने 38 आणि 49व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अन्य एका सामन्यात एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब संघाला पीसीएच लायन्स संघाविरुद्ध विजयासाठी शूट-आऊटची वाट बघावी लागली. नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर एनडीए संघाने 4-3 असा विजय मिळविला.

संदीप सिंगने 10व्या मिनिटाला एनडीए संघाला आघाडीवर नेले, तर विकास सिंगने 16व्या मिनिटाला पीसीएच संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर शूट आऊटमध्ये एनडीएसाठी संदीप सिंग, दिनेश माने, सकलेंबा ए. अजेश सीए यांनी गोल केले. पराभूत संघाकडून आकाश पोखरकर, सदानंद स्वामी आणि वैभव चौले यांनाच गोल करता आले. (Durga S.A ease on; Sangam Y.B, NDA YSC advance )

निकाल-
संगम यंग बॉईज 2 (साहिल कदम 20वे मिनिट, विपुल गोफाने 45वे मिनिट) वि.वि. हायलॅंडर्स एफसी 0

दुर्गा एस.ए. 4 (मयुर वाघिरे 10वे मिनिट, नेल्सन पास्ते 23वे मिनिट, धीरज माने 38, 49वे मिनिट) वि.वि. डिएगो ज्युनियर्स एफसीए 0

एनडीए युथ स्पोर्टस क्लब 1 (4) (संदीप सिंग 11वे मिनिट, संदीप सिंग, दिनेश माने, सकलेम्बा ए., अजेश सीए) वि.वि. पीसीएच लायन्स एस.सी. 1 (3) (विकास सिंग 16वे मिनिट, आकाश पोखरकर, सदानंद स्वामी, वैभव चौले)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऍस्पायर चषक फुटबॉल स्पर्धेत सिटी एफसी अन् सनी डेज संघांची आगेकूच
सांगवी एफ.सी., नॉईझी बॉईजचा सहज विजय, एबीसी संघाला विजयासाठी करावा लागला संघर्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---