काही दिवसांपूर्वी भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पॉडकास्टवर धक्कादायक खुलासा केला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळताना संघात सहभागी ऑस्ट्रेलियाच्या एंड्य्रू सायमंड्स आणि न्यूझीलंडच्या जेम्स फ्रँकलिन यांना त्याचे हात-पाय बांधले होते आणि त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावत त्याला एका खोलीत सोडून दिले गेले होते.
आता या प्रकरणी डरहम क्रिकेटने (Durham Cricke) अधिकृत वक्तव्य केले आहे. डरहम या प्रकरणी जेम्स फ्रँकलिन (James Franklin) आणि इतर सदस्यांची चौकशी करत आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना २०११ चँपियन्स लीग स्पर्धेदरम्यान घडली होती. त्यावेळी सायमंड्स, फ्रँकलिन आणि चहल मुंबई इंडियन्स संघाचा भाग होते. त्यावेळी फ्रँकलिन आणि सायमंड्सने चहलला पूर्ण रात्र बांधून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला सोडले होते. महतत्वाचे म्हणले, या प्रकरणी त्या दोघांपैकी कोणीही चहलची क्षमा मागितली नव्हती.
हा प्रसंग सांगताना चहल म्हणाला होता की, “मी हा प्रसंग कोणालाच सांगितला नाहीये, पण आता लोकांना याविषयी कळेल. ही आयपीएल २०१३ची गोष्ट आहे. जेव्हा मी मुंबई इंडियन्सचा भाग होतो. आमचा एक सामना बेंगलोरमध्ये होता. सामना संपल्यानंतर एक पार्टी होती. तेव्हा त्याठिकाणी एक विदेशी खेळाडू होता, जो पूर्णपणे दारूच्या शनेत होता. मी त्याचे नाव घेणार नाही. तो खूप जास्तच नशेत होता. खूप वेळापासून तो माझ्याकडे बघत होता, नंतर त्याने मला जवळ बोलावले.”
“त्या विदेशी खेळाडूने मला बाहेर नेले आणि १५व्या मजल्याच्या बालकनीत टांगले. माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात होते. जर माझी पकड थोडी ढिल्ली पडली असती, तर मी १५व्या मजल्यावर होतो. त्याठिकाणी खूप सारे लोक होते, ज्यांनी हा प्रसंग पाहिला. ते तात्काळ आले आणि प्रसंग कसातरी नियंत्रणात आणला. मी बेशुद्ध झालो, मग लोकांनी मला पाणी पाजले. त्यादिवशी मला समजले की, बाहेर जाताना आपण किती काळजी घेतली पाहिजे. ही एक अशी घटना होती, ज्यामध्ये माझा जीव जाता-जाता वाचला. कारण थोडी चूक झाली असती, तर खाली पडलो असतो,” असे चहल पुढे बोलताना म्हणाला.
जाणून घ्या डरहमकडून आलेली प्रतिक्रिया
फ्रँकलिनच्या या प्रकरणी भूमिका सांगताना डरहमने (Durham Cricket To Enquire James Franklin) बीबीसीला सांगितले की, “आम्ही २०११ मधील या घटनेबद्दल ऐकून आहोत. जवळपासच्या वृत्त अहवालांमधून आम्हाला याबद्दल माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये आमच्या स्टाफमधील एका सदस्याचे नाव आहे. कर्मचार्यांचा समावेश असलेल्या कोणत्याही बाबीप्रमाणे क्लब तथ्ये निश्चित करण्यासाठी सहभागी सर्व पक्षांशी खाजगीपणे बोलेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
किती आले, किती गेले; पण दिल्लीकडून सेहवागनंतर फक्त पृथ्वी शॉच करू शकला ‘हा’ भीमपराक्रम
‘महाराष्ट्र केसरी’ जिंकणाऱ्या पैलवानाबाबत जे घडलंय ते आख्ख्या राज्यासाठी लज्जास्पद!






