भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर दुसऱ्या टी२० सामन्यात ६ विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकेत २-०ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाचा धडाकेबाज धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत खास कारनामा केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत १९४ धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने २ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले. यावेळी भारताकडून सलामीला फलंदाजी करण्यास उतरलेल्या धवनने अफलातून अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ५२ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारही ठोकले.
यासह धवनने एमएस धोनीला टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. धवनने आतापर्यंत ६३ टी२० सामने खेळताना १६४१ धावा केल्या आहेत, तर धोनीने ९८ टी२० सामने खेळताना १६१७ धावा केल्या होत्या.
याव्यतिरिक्त धवनने सुरेश रैनालाही मागे टाकले आहे. रैनाने आतापर्यंत ७८ टी२० सामने खेळताना १६०५ धावा केल्या होत्या. भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत २८४३ धावांसह विराट कोहली अव्वल क्रमांकावर आणि २७७३ धावांसह रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता धवनचे लक्ष्य विराट आणि रोहितच्या विक्रमावर आहे.
भारताकडून टी२०त सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२८४३ धावा- विराट कोहली
२७७३ धावा- रोहित शर्मा
१६४१ धावा*- शिखर धवन
१६१७ धावा- एमएस धोनी
१६०५ धावा- सुरेश रैना
महत्त्वाच्या बातम्या-
धवनने पाडला धावांचा पाऊस; अर्धशतक करत गंभीर, रैनालाही टाकले मागे
अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर