Tuesday, May 17, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर

December 6, 2021
in खेळाडू
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


संपुर्ण नाव- श्रेयस संतोष अय्यर

जन्मतारिख- 6 डिसेंबर, 1994

जन्मस्थळ- मुंबई

मुख्य संघ- भारत, दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया ग्रीन, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, मुंबई, मुंबई क्रिकेट असोसिएशन एकादश, 19 वर्षांखालील मुंबई संघ, शेष भारतीय संघ आणि पश्चिम विभाग 

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख -25 ते 29 जानेवारी, 2006, ठिकाण – कानपूर

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 10 डिसेंबर, 2017, ठिकाण – धरमशाला

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 1 नोव्हेंबर, 2017, ठिकाण – दिल्ली

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी – सामने – २, धावा – 202, शतके – 1

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 22, धावा- 813, शतके- 1

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 22, धावा- 417, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-श्रेयस अय्यर हा संतोष अय्यर या मुंबईतील बिजनेसमनचा मुलगा आहे. त्याची आई रोहिनी या गृहीणी आहेत. त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर ही डान्सर आणि कोर्योग्राफर आहे.

-वयाच्या 10व्या वर्षी अय्यरने शिवाजी पार्क जिमखाना क्रिकेट अकादमीतून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तो 12 वर्षांचा असताना प्रशिक्षक प्रविन अमरेंनी त्याला प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्याला वयोगटातील क्रिकेटमध्ये पी शिवलकर आणि विनोद राघवन यांचे प्रशिक्षण लाभले.

-2014मध्ये श्रेयसने युनाइटेड किंगडमच्या दौऱ्यावर ट्रेंट ब्रिज क्रिकेट संघाकडून 3 सामने खेळले होते. यावेळी त्याने 99च्या सरासरीने 297 धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक 171 धावांचा समावेश होता.

-2014-15मध्ये अय्यरने मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या हंगामातच त्याने 50पेक्षा जास्त सरासरीने 809 धावा केल्या होत्या. यासह तो हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

-2015च्या आयपीएल लिलावात अय्यरला दिल्ली डेअरडेविल्सने 2.6 कोटींना विकत घेतले. यासह तो भारतीय क्रिकेट संघात न खेळताही आयपीएलमध्ये इतक्या महाग किमतीत विकला जाणारा क्रिकेटपटू ठरला.

-पदार्पणाच्या आयपीएल हंगामातच अय्यरने 33.76च्या सरासरीने 439 धावा केल्या होत्या.

-तर, 2016मध्ये मुंबईकडून खेळत अय्यरने प्रथम श्रेणीत 1321 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 4 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तर रणजी ट्रॉफी हंगामात 1300 पेभा जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला.

-देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ठ खेळीने 2017मध्ये अय्यरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत संघात पर्याय म्हणून निवडण्यात आले होते.

-पुढे नोव्हेंबर 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अय्यरने टी20 पदार्पण केले. त्याला यावेळी पहिल्या सामन्यात फलंदाजी मिळाली नाही. पण त्याने दुसऱ्या सामन्यात 23 धावा केल्या होत्या.

-श्रीलंकाविरुद्ध डिसेंबर 2017मध्ये वनडे पदार्पण केल्यानंतर अवघ्या दुसऱ्या डावात अय्यरने 88 धावा केल्या. पण त्याच्या नाखूश खेळीमुळे त्याला सामने खेळता आले नाहीत. 2019मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.


ADVERTISEMENT
Next Post
Jasprit-Bumrah

मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह

Photo Courtesy: Twitter/ICC

HBD जड्डू! बॅटने तलवारबाजी करणाऱ्या ‘सर जडेजा’च्या ३ उत्कृष्ट खेळ्या

Photo Courtesy: Twitter/ICC

मराठीत माहिती- क्रिकेटर आरपी सिंग

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.