भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंगहॅम कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशीच पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे पाचव्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला होता. परंतु याच दरम्यान अत्यंत खेदाची बाब आहे की, ट्रेंट ब्रिजमधून वर्णभेदी टिका केल्याची बातमी आली आहे, ज्यात भारतीय क्रिकेटपटूंवर आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
ब्रिटिश महिलेचा धक्कादायक खुलासा
भारतीय संघाची चाहती असलेल्या ३१ वर्षीय ब्रिटिश महिलेने रेडीट वेबसाईटवर दावा केला आहे की, ट्रेंट ब्रिजवर सुरू आलेल्या कसोटी मालिकेदरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही इंग्लंडच्या चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना शिवीगाळ केली आहे. ही महिला तिच्या कुटुंबासह पहिला कसोटी सामना पाहण्यासाठी आली होती. ज्यांनी वांशिक टीकेच्या घटनेवर गप्प न राहण्याचे ठरवले.
विराट आणि शमीवर वांशिक टीका
या महिलेच्या मतानुसार, विराट कोहलीवर रिव्ह्यू गमावल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी वांशिक टीका करायला सुरू केली होती. याशिवाय सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद शमीलाही वाईट शब्द बोलले गेले आहेत.
महिला अडकली वादाच्या भोवऱ्यात
ब्रिटीश महिलेने स्टँडमध्ये उपस्थित गार्डकडे याबद्दल तक्रार केली, ज्यामुळे तिला ‘गो बॅक टू इंडिया’ची टीका ऐकावी लागली. पुढे कडक कारवाई करत गार्डने आरोपी चाहत्यांना चालू सामन्यातून बाहेर हकलवून दिले होते. मात्र, या कुटुंबाने आरोपींवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही.
भारतीयांना ‘डेल्टा’ म्हणून छेडले
या घटनेनंतर, ती महिला आणि तिचे कुटुंब अशा स्टँडवर शिफ्ट झाले जेथे भारतीय चाहत्यांची संख्या जास्त होती. परंतु असे असूनही, त्यांचा त्रास कमी झाला नाही. इतर ब्रिटीश चाहत्यांनी भारतीयांना ‘डेल्टा’ म्हणत त्यांची छेड काढण्यास सुरुवात केली होती. महत्त्वाचे म्हणजे, भारतातील कोरोना महामारीच्या व्हायरसला ‘डेल्टा’ असे म्हणतात. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंवर अशा शब्दांत टीका होणे अतिशय दुर्दैवी बाब आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कडवट आठवणी
भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारतीय खेळाडूंना वांशिक टीकांना सामोरे जावे लागले होते. सिडनी कसोटी दरम्यान मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना शिवीगाळ करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलची नवी नियमावली वाचलीत का? स्टँडमध्ये चेंडू गेल्यास त्याने नाही खेळला जाणार सामना
दिनेश कार्तिक आता तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही, ‘हा’ खेळाडू आहे त्याला कारण
शुभमंगल सावधान! न्यूझीलंडचा कोरी अँडरसन चढला बोहल्यावर; लग्नानंतर आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट