---Advertisement---

मोदी है तो, ये मुमकिन है! रिकाम्या स्टेडिअमकडे पाहून हात हलवणारे क्रिकेटर.. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

On: सोमवार, ऑक्टोबर 5, 2020 6:43 PM
---Advertisement---

शनिवारी (३ ऑक्टोबर) रोहतांग येथील जगातील सर्वात मोठ्या ‘अटल’ टनेल या बोगद्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या टनेलचे नाव भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनी असे काही कृत्य केले की त्यामुळे ते सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहेत.

झाले असे की, उद्घाटनानंतर मोदी बोगद्यामध्ये कॅमेऱ्याद्वारे फोटो काढू लागले. यादरम्यान ते लाखो लोकांना अभिवादन करत असल्याप्रमाणे हात हलवत जाताना दिसले. त्यांच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काही चाहत्यांनी याचा संबंध थेट आयपीएलशी जोडला आहे.

कारण कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२० चे आयोजन युएईमध्ये होत आहे. त्यामुळे सामने हे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत.

चाहत्यांनी मोदींना ट्रोल करत ट्विटरवर लिहिले आहे की, जर मोदी आयपीएलमधील संघातील क्रिकेटपटू असते, तर ते रिकाम्या स्टेडियमकडे पाहून हात हलवत असते आणि झेल सोडत असते.

तर इतर काही चाहत्यांनीही मोदींना ट्रोल करत म्हटले आहे की, “कल्पना करा तुम्ही हॉटस्टारवर आयपीएल पाहत आहात. त्यामध्ये रिकामे स्टेडियम आहे. आणि तुम्हाला ओरडण्याचा आवाज येतोय? अगदी त्याचप्रकारे मोदीजी लोक नसूनही हात हलवत आहेत.”

https://twitter.com/Inferno1510/status/1312635375005827073

https://twitter.com/buddha2019/status/1312615561596084224

चाहत्यांनी मोदींंना ट्रोल करत त्यांच्या सरकारची तुलना आयपीएलमधील रिकाम्या स्टेडियमसोबत केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---