---Advertisement---

सराव सामन्यात टीम इंडियाचे दोन धुरंधर खेळतायत इंग्लंड संघाकडून; कारण आले समोर

On: गुरूवार, जुलै 22, 2021 8:09 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ डरहॅममध्ये इंग्लंडच्या काऊंटी सिलेक्ट 11 विरुद्ध 3 दिवसीय सराव सामना खेळावा लागत आहे. परंतु या तीन दिवसीय सामन्यात आश्चर्यकारक बाब म्हणजे भारताचे 11 नव्हे, तर 13 खेळाडू मैदानात खेळण्यासाठी आले आहेत.

हे सर्व खेळाडू भारतातून खेळत नसले, तरीही भारतीय संघाचा राखीव वेगवान गोलंदाज आवेश खान आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या सराव सामन्यात डरहॅम मैदानावर सुरू असलेल्या भारतीय संघाविरूद्ध खेळत आहेत. दोन्ही खेळाडू सामन्यापूर्वी काऊंटीच्या सिलेक्ट 11 शिबिरामध्ये सामील झाले होते आणि ते भारताविरुद्ध खेळत आहेत. (During the practice match 2 Indian players played for the England team, as the front came)

याच दरम्यान क्रिकेटच्या मैदानावर हा एक दुर्मीळ क्षण पाहायला मिळाला. हा क्षण पाहिल्यानंतर चाहते सतत हा प्रश्न विचारत होते की, अखेर या 2 भारतीय खेळाडूंनी त्यांच्याच संघाविरुद्ध खेळण्यामागे नक्की काय कारण आहे? याचे उत्तर वॉशिंग्टन सुंदर याने दिले आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान काउंटी सिलेक्ट 11 संघाकडून का खेळत आहेत.

खरं तर, काऊंटी सिलेक्ट 11 संघाचे दोन सदस्य जेम्स ब्रॅसी आणि जॅक चॅपेल यांनी सामन्याआधी आपली नावे मागे घेतली, ज्यामुळे काउंटी संघाने भारताला दोन खेळाडू देण्याचे आवाहन केले होते. याला उत्तर देत भारतीय संघाने वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना काउंटी सिलेक्ट संघाकडून खेळण्याची परवानगी दिली आहे. उल्लेखनीय आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीशी संपर्क आलेल्या जेम्स ब्रेसीला कडक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, तर या सामन्याच्या एक दिवस आधी जॅक चॅपेल देखील जखमी झाला आहे.

मात्र, भारतीय संघाला काऊंटी निवड समितीत आवेश खानला देऊन अवघड झाले आहे. विशेष म्हणजे सोमवारी (१९ जुलै) भारतीय संघ फलंदाजी करत असताना हनुमा विहारीने आवेश खानच्या चेंडूवर सरळ ड्राईव्ह मारली. हा शॉट अडवत असताना गोलंदाजी करीत असलेल्या आवेश खानला अंगठ्याला दुखापत झाली आणि आता उर्वरित सराव सामन्यासाठी त्याला संघातून बाहेर जावे लागणार आहे. आवेश खानला 9.5 षटकांत 41 धावा देत एकही विकेट घेता आली नाही.

दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरसाठी हा सामना काही खास नव्हता. त्याला खेळाच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजीला बोलवले गेले नाही, तर दुसर्‍या दिवशी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर आला, तेव्हा तो फक्त 1 धाव करत तंबूत परतला. त्याच दरम्यान भारतीय संघाचा केएल राहुल 101 धावा आणि रवींद्र जडेजा 75 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 311 धावा केल्या, तर दुसर्‍या दिवशी 77 षटकांच्या अखेरपर्यंत काऊंटी निवडक 11 खेळाडूच्या संघाने 6 गडी बाद होत 198 धावा केल्या. हसीब हमीदने काऊंटी निवड संघातून शतकी खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ

-हार्टब्रेक! शुबमन गिल परतला भारतात; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून दुर्दैवीरीत्या व्हावे लागले बाहेर, पाहा फोटो

-आणखी काय हवं! सराव सामन्यात शतक झळकावताच ‘त्याची’ इंग्लंड संघात झाली निवड; ५ वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---