नेपीयर। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना न्यूझीलंडला 38 षटकात 157 धावांतच रोखले आहे.
भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने न्यूझीलंडच्या केन विलियमसन, डो ब्रासवेल, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेंट बोल्ट यांची विकेट घेतली आहे. बोल्ट हा न्यूझीलंडच्या डावातील शेवटची विकेट ठरला.
पण त्याला बाद करण्याआधी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने कुलदीपला खास सल्ला दिला होता. हा सल्ला स्टंप माईकमधून ऐकू आला.
झाले असे की 37 व्या षटकात न्यूझीलंडकडून बोल्ट आणि टिम साउथी फलंदाजी करत असताना धोनीने कुलदीपला सांगितले की ‘बोल्ट डोळे झाकून बचावात्मक खेळेल. त्यामुळे तू दुसरा चेंडू टाकू शकतो.’ (‘ये आंख बंद करके रोकेगा. दूसरा वाला डाल सकता है इसको’).
धोनीच्या या सल्ल्यानंतर कुलदीपने गुगली बॉल टाकत बोल्टला बाद केले. बोल्टचा झेल पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या रोहित शर्माने घेतला.
धोनी या सामन्यात याआधीही चहलला आणि कुलदीपला वेळोवेळी सल्ले देताना दिसला आहे.
"Yeh aank band karke rokega. Dusra waala daal sakta hai isko." MS Dhoni from behind the stumps reads Boult, suggests Kuldeep to bowl a googly. Kuldeep obliges and Rohit takes a simple catch at first slip.
NZ have been bowled out for 157. #CricketMeriJaan #NZvIND
— Mumbai Indians (@mipaltan) January 23, 2019
@msdhoni literally dictated that last wicket step by step before it happened. #NZvIND #Dhoni pic.twitter.com/QwPyuE1mEv
— Venkat (@Vencuts) January 23, 2019
न्यूझीलंडकडून या सामन्यात फक्त कर्णधार केन विलियमसनने चांगला प्रतिकार केला, त्याने 81 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांना त्याची साथ देण्यात अपयश आले.
भारताकडून कुलदीप व्यतिरिक्त मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–शिखर धवनने १०वी धाव घेताच केला हा गब्बर विक्रम
–मोहम्मद शमीने केली कमाल, भारताकडून केली विकेट्सची सेंच्यूरी पूर्ण
–या भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडला त्यांच्याच देशात दिला आहे त्रास