---Advertisement---

शिखर धवनने १०वी धाव घेताच केला हा गब्बर विक्रम

On: बुधवार, जानेवारी 23, 2019 11:30 AM
---Advertisement---

नेपीयर। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 157 धावा करत भारतासमोर विजयासाठी 158 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवारांच्या जोडीने चांगली सुरुवात केली. त्यांनी भारताकडून सामन्यात ब्रेक झाला तेव्हा 9 षटकात बिनबाद 41 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहित 11 धावांवर आणि शिखर 29 धावांवर नाबाद खेळत आहेत.

याबरोबरच शिखरने जेव्हा या सामन्यातील 10 वी धाव घेतली तेव्हा त्याने खास विक्रम केला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा त्याने 118 व्या वनडे डावात पूर्ण केला आहे.

त्यामुळे तो वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. लारा यांनीही 118 डावात 5000 वनडे धावांचा टप्पा गाठला होता.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज हाशिम अमला आहे. अमलाने 101 वनडे डावात 5000 धावांचा टप्पा गाठला होता.

त्याचबरोबर शिखर हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

हा पराक्रम करताना त्याने सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीने 126 डावात 5000 वनडे धावा केल्या होत्या. या यादीत विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 114 डावात वनडेत 5000 धावांचा टप्पा गाठला होता.

वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणारे फलंदाज (डावांनुसार) – 

101 – हाशिम अमला

114 – विवियन रिचर्डसन/ विराट कोहली

118 – ब्रायन लारा/ शिखर धवन

119 – केन विलियमसन

121 – गॉर्डन ग्रीनिज

वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणारे भारतीय फलंदाज (डावांनुसार)- 

114 – विराट कोहली

118 – शिखर धवन

126 – सौरव गांगुली

135 – गौतम गंभीर/ एमएस धोनी

138 – सचिन तेंडुलकर

महत्त्वाच्या बातम्या-

मोहम्मद शमीने केली कमाल, भारताकडून केली विकेट्सची सेंच्यूरी पूर्ण

या भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडला त्यांच्याच देशात दिला आहे त्रास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment