पुणे, 31 ऑक्टोबर 2023- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघाने सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
व्हेरॉक क्रिकेट मैदानावरील लढतीत रोहित चौधरी (1-37 व नाबाद 36धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघाने पीबीकेजेसीए संघाचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डीव्हीसीएच्या टिळक जाधव 2- 22, करिक शेवाळे 3-28, रोहित चौधरी 1-37) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे पीबीकेजेसीए संघाचा 42.5 षटकात सर्वबाद 225धावावर संपुष्टात आला. यात ओंकार खाटपे 76, अभिषेक पवार 46, शशी गावंडे नाबाद 18 यांनी धावा केल्या.
याच्या उत्तरात हे आव्हान डीव्हीसीए संघाने 46.4षटकात 7बाद 226धावा करुन पुर्ण केले. यात विनय पाटीलने 78चेंडूत 2चौकार व 3षटकारासह 53धावा, यश जगदाळेने 36धावा, रोहित चौधरीने नाबाद 36धावा, ओंकार राजपूतने 24धावा, टिळक जाधवने 19 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
निकाल: व्हेरॉक क्रिकेट अकादमी मैदान:
पीबीकेजेसीए : 42.5 षटकात सर्वबाद 225धावा(ओंकार खाटपे 76(75,11×4,3×6), अभिषेक पवार 46(67,4×4,1×6), शशी गावंडे नाबाद 18, टिळक जाधव 2- 22, करिक शेवाळे 3-28, रोहित चौधरी 1-37) पराभुत वि.डीव्हीसीए: 46.4षटकात 7बाद 226धावा (विनय पाटील 53(78,2×4,3×6), यश जगदाळे 36(36,8×4) , रोहित चौधरी नाबाद 36(43,3×4), ओंकार राजपूत 24, टिळक जाधव 19, यश खळदकर 2-31, सचिन भोसले 2-46); सामनावीर-रोहित चौधरी; डीव्हीसीए संघ 3 गडी राखून विजयी.
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकादरम्यान वानखेडेत मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे उद्घाटन, इथेच खेळलेला कारकिर्दीतील अखेरचा सामना
डी कॉकनंतर ड्यूसेनने दाखवला दर्जा! ‘इतक्या’ चेंडूत ठोकली विश्वचषक हंगामातील दुसरं शतक