चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 चे विजेतेपद आपल्या नावे यासह त्यांनी मुंबई इंडियन्सच्या पाच आयपीएल विजेतेपदांची बरोबर केली. क्रिकेट जगतात सातत्याने अशी चर्चा होत असते की आयपीएलमधील सर्वोत्तम संघ कोणता आहे. यावरून मुंबई व चेन्नईच्या चाहत्यांमध्ये वादही होत असतात. आता हाच वाद वेस्ट इंडीजचे दोन माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो व कायरन पोलार्ड यांच्या दरम्यान रंगला. अखेर या वादात ब्राव्होने पोलार्डला शांत केले.
ब्राव्हो यंदा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. प्रशिक्षक म्हणून प्रथमच काम करत असताना त्याने संघाला विजय मिळवून दिला. यापूर्वी चेन्नई साठी खेळाडू म्हणून त्याने चार विजेतेपदे पटकावली आहेत. दुसरीकडे मुंबईला पाच वेळा आयपीएल विजेता बनवणार पोलार्डही यावेळी प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. मात्र, मुंबई इंडियन्सला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
https://www.instagram.com/reel/Cs88mcOuAWj/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
याच मुद्द्यावर पोलार्ड याने मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटले. तर ब्राव्होने चेन्नई दहा वेळा अंतिम सामना खेळल्याने तसेच 5 वेळा विजेते असल्याने आपले वजन चेन्नईच्या पारड्यात टाकले.
ब्राव्होने आपल्या कारमधून पोस्ट केलेल्या या व्हिडिओत हे दोघे याच प्रकरणावर चर्चा करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिताना ब्राव्हो म्हणाला,
“कुणीतरी आमच्यातील हा वाद मिटवा. तसं सांगायचं झालं तर माझ्याकडे आता 17 ट्रॉफी आहेत. तू अजून 15 वरच आहेस. त्यामुळे माझे नाव घेताना थोड्या इज्जतीने घेत जा’
यानंतर पोलार्ड माघार घेतल्याचे दिसून येतो. वेस्ट इंडीजचे हे दोन्ही अष्टपैलू टी20 चे दिग्गज म्हणून ओळखले जातात. जगभरातील विविध लीगमध्ये त्यांना मोठी मागणी असत. तसेच या दोघांच्या नावे सर्वाधिक टी20 लीग विजेतेपदाचे विक्रम आहेत.
(Dwayne Bravo And Kieron Pollard Banter On CSK MI Rivalry)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
WTC फायनलवर पावसाचे सावट! खेळ न झाल्यास असा ठरवला जाणार विजेता
धक्कादायक! इंग्लंड क्रिकेट संघाच्या बस समोर निदर्शने, लॉर्ड्स कसोटीआधी घडला प्रकार






