आयपीएल २०२१ स्पर्धेत गुरुवारी (७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. हा सामना पंजाब किंग्स संघासाठी अतिशय खास होता. कारण हा सामना १२ षटकात जिंकून पंजाब किंग्स संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्याची सुवर्णसंधी होती. शेवटी १३ व्या षटकात केएल राहुलने पंजाब किंग्स संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर पंजाब किंग्स संघाच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण होते. तर पराभूत होऊनही चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले.
वेस्ट इंडीजचा खेळाडू आणि आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा ड्वेन ब्रावो याने गुरुवारी(७ ऑक्टोबर) आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. गेली अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या ड्वेन ब्रावोचा वाढदिवस टीम हॉटेलमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Today's reason to Smile :DJ's bday 😍#SuperBirthday #CHAM47ION #WhistlePodu #Yellove 🦁💛 @DJBravo47 pic.twitter.com/axABQKkFVL
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 7, 2021
चेन्नई सुपर किंग्स संघांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ड्वेन ब्रावोच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये केक कापण्यापूर्वी डोक्यावर रुमाल ठेवताना दिसून येत आहे. त्यानंतर एमएस धोनी त्याला मागून पकडतो आणि केक कापल्यानंतर सुरेश रैना त्याच्या तोंडाला केक लावण्यासाठी धावतो. त्यानंतर सर्वच खेळाडू त्याच्या तोंडाला केक लावतात. हे सर्व झाल्यानंतर सुरेश रैना,रवींद्र जडेजा, एमएस धोनी आणि प्रशिक्षक फ्लेमिंग त्याला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवर त्यांनी कॅप्शन म्हणून “आजच्या हसण्याचे कारण : डिजेचा वाढदिवस” असे लिहिले आहे
चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिसची ७६ धावांची खेळी वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १३४ धावा करण्यात यश आले. या धावांचा पाठलाग करताना केएल राहुलच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्स संघाने १३ षटकात हे आव्हान पूर्ण केले.