विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने आज(25 आॅक्टोबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण त्याने एका सामन्यात क्रिकेट बॉल ऐवजी टेनिस बॉल वापरल्याने एका मोठ्या वादातही सापडला आहे.
ब्रावोने हा टेनिस बॉल विंडीजच्या सुपर 50 कप या देशांतर्गत स्पर्धेतील त्रिनीदाद अँड टोबॅगो विरुद्ध विंडीज ब या संघात 11 आॅक्टोबरला झालेल्या सामन्यात वापरला होता.
या सामन्यात ही घटना त्रिनीदाद अँड टोबॅगो हा संघ 318 धावांचा बचाव करत असताना घडली. याबद्दल विंडीज ब संघाचा सलामीवीर फलंदाज किमानी मेलीयसने पंचांना प्रश्नही विचारला होता.
पण जॅकलिन विल्यियम्स आणि व्हिएम स्मिथ या मैदानावरील पंचांनी याकडे दुर्लक्ष केले आणि मेलीयसने या चेंडूवर घेतलेल्या दोन धावा गृहीत धरण्यात आल्या.
या घटनेबद्दल विंडीज क्रिकेट बोर्ड चौकशी करत आहे. याबद्दल मिररने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑपरेशन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक रोलॅन्ड होल्डर म्हणाले, ‘विंडीज क्रिकेट बोर्ड सध्या या घटनेबद्दल चौकशी करत असून आणि यावर आत्ता कोणतेही भाष्य केले जाऊ शकत नाही.’
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीसी) ने हा सामना आंतरराष्ट्रीय नसल्याने याविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
ब्रावोने जेव्हा टेनिस बॉलने गोलंदाजी केली तेव्हा सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. या सामन्यात त्रिनीदाद अँड टोबॅगो संघाने 70 धावांनी विजय मिळवला. ब्रावोने यात 2 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–उर्वरित वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन मोठे बदल
–क्रिकेट इतिहासातील सर्वात दिग्गज कर्णधाराचे विक्रम विराटने किरकोळीत मोडले
–१० हजार धावा करताना सचिन-कोहलीबरोबर घडले हे ५ खास योगायोग