---Advertisement---

फुल ऑन एंटरटेनमेंट! लाईव्ह सामन्यात ड्वेन ब्रावोला चढला ‘वाथी फिवर’, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 9:38 AM
---Advertisement---

कॅरेबियन संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू ड्वेन ब्रावो हा नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तो मैदानात असताना फलंदाजी करो किंवा गोलंदाजी, चाहत्यांचे मनोरंजन होणार हे नक्की. अशातच पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने केलेल्या आगळ्या वेगळ्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दीपक चाहरने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत पंजाब किंग्ज संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या ड्वेन ब्रावोने गडी बाद केल्यानंतर आगळ्या वेगळ्या पद्धतीने जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले आहे.

धोनीने १७ वे षटक टाकण्यासाठी ब्रावोला गोलंदाजीसाठी बोलवले होते. या षटकातील ५ व्या चेंडूवर मुर्गन अश्विन ६ धावा करत माघारी परतला होता. मिड ऑफच्या वरुन फटका मारण्याच्या प्रयत्नात तो फाफ डू प्लेसीच्या हातून झेलबाद झाला होता. हा गडी बाद केल्यानंतर ब्रावोने ‘वाथी कमिंग’ स्टाईलमध्ये जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/TVFOfficial/status/1383079336522096642?s=20

https://twitter.com/CricketUnlimi/status/1383080309294452746?s=20

पंजाब किंग्ज संघाचे फलंदाज ठरले फ्लॉप
पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर अवघ्या १०६ धावा करण्यात यश आले होते. पंजाब किंग्ज संघाकडून शाहरुख खानने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर रिचर्डसनने १५ धावा योगदान दिले. तसेच संघातील मुख्य फलंदाज केएल राहुल ५ धावा करत माघारी परतला होता. तर ख्रिस गेलने अवघ्या १० धावा केल्या होत्या. तसेच मयंक अगरवाल (० धावा) या सामन्यात देखील फ्लॉप ठरला. यासोबतच निकोलस पूरन देखील शून्य धावा करत माघारी परतला होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून मिळवला विजय
पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या १०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फाफ डू प्लेसिसने ३६ धावांची खेळी केली. तर, मोईन अलीने ताबडतोड ४६ धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाड ५ धावा करत माघारी परतला होता. या विजयासोबतच चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत पहिला विजय साजरा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीची सीएसकेकडून सामन्यांची ‘डबल सेंचूरी’; म्हणाला, आता मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!

सीएसकेने सामना जिंकला, पण अंबाती रायुडूच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम

दिल्लीला दिलासा! ‘या’ खेळाडूचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल होता चुकीचा; आता फलंदाजांवर आग गोळे फेकण्यास तयार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---