---Advertisement---

Video : आयपीएलमधून बाहेर पडलेल्या ड्वेन ब्राव्होचा चेन्नईच्या चाहत्यांसाठी भावूक संदेश, म्हणाला…

On: गुरूवार, ऑक्टोबर 22, 2020 11:19 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला अद्यापही काही खास कामगिरी करता आलेली नाही. यातच या संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो मांडीच्या दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर झाला आहे. यानंतर आता तो परत जात असताना त्याने सीएसकेला पाठिंबा देत राहा असा भावुक संदेश चाहत्यांना ट्विटरवर दिला आहे.

अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने व्हिडिओ संदेशमध्ये म्हटले आहे की, “सीएसके संघातून बाहेर पडणे ही एक खेदजनक बाब आहे. आमच्या सर्व सीएसके चाहत्यांनी संघाला पाठिंबा द्यावा, अशी माझी इच्छा आहे. आम्ही चांगली कामगिरी करावी अशी चाहत्यांची इच्छा होती. कधीकधी उत्कृष्ट कामगिरीनंतरही मनाप्रमाणे निकाल लागत नाही. सीएसकेला समर्थन देत रहा. मी याची गॅरंटी देऊ शकतो की आम्ही चॅम्पियन म्हणून पुनरागमन करू. आपल्याला सीएसकेचे चाहते असल्याचा अभिमान असला पाहिजे.”

https://twitter.com/ChennaiIPL/status/1318892176865067011?s=20

ड्वेन ब्राव्हो या आयपीएलमध्ये फक्त 6 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 7 बळीही घेतले आहेत. त्याला फलंदाजीत फारशी संधी मिळू शकली नाही.

ड्वेन ब्राव्होला 17 ऑक्टोबर रोजी शारजाह येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुखापत झाली होती. त्या सामन्यात त्याला 4 षटके गोलंदाजीही करता आली नाही आणि सामन्याच्या मध्येच तो मैदानाबाहेर गेला.

चेन्नई सुपर किंग्सने या आयपीएल हंगामात आतापर्यंत निराशाजनक कामगिरी बजावली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 10 सामन्यांपैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत चेन्नई सध्या तळाशी आहे. अशा परिस्थितीत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची त्यांची आशा आता जवळपास संपली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे केकेआरच्या फलंदाजांची शरणागती; गुणतालिकेत थेट दुसऱ्यास्थानी

‘त्याला अगदी मनाप्रमाणे बाद केले’, आपल्या गोलंदाजीने केकेआरला इंगा दाखवणाऱ्या सिराजची प्रतिक्रिया

अखेर ३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘हा’ भारतीय दिग्गज करणार पुनरागमन

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज

आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज

आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---