इंडियन प्रीमीयर लीग २०२२ चे (Indian Premier League 2022) बिगुल वाजले असून १२-१३ फेब्रुवारी रोजी या हंगामासाठी मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. या लिलावाला अजून २ आठवडे शिल्लक असताना लिलावात अंतिम निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण, आता ५९० खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे. या ५९० खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwyane Bravo) याचेही नाव आहे.
यंदाच्या लिलावात उतरत ब्रावो आयपीएलचे सर्व १५ हंगाम खेळणारा (First Overseas Player To Play 15 IPL Seasons) पहिला आणि एकमेव परदेशी खेळाडू (First Overseas Player) ठरणार आहे. ब्रावो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या टी२० लीगचा भाग आहे.
२००८ मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पुढे सलग ३ वर्षे तो मुंबई संघाचा भाग राहिला. मुंबई फ्रँचायझीने त्याला पहिल्या हंगामासाठी ६०.२ लाख, दुसऱ्या हंगामासाठी ७३.६ लाख आणि तिसऱ्या हंगामासाठी ६९.४ लाख इतका पगार दिला होता. त्यानंतर आयपीएल २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला ९२ लाखांच्या किंमतीला विकत घेतले. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्याला चेन्नईकडून अनुक्रमे १.०५ कोटी आणि १.०६ कोटी दिले गेले.
हेही वाचा- ठरलं तर! आयपीएल २०२२ साठी तब्बल ५९० खेळाडूंचा होणार लिलाव; ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचा समावेश
टी२० स्वरुपातील या लीगमध्ये आपल्या प्रदर्शनाने धुमाकूळ घातल्यानंतर पुढे आयपीएल २०१४ मध्ये त्याची किंमत मोठ्या अंतराने वाढली. चेन्नई सुपर किंग्जला त्याला संघात कायम ठेवण्यासाठी ४ कोटींची किंमत मोजावी लागली. पुढील २०१५ हंगामातही ब्रावोने चेन्नई सुपर किंग्जक़ून ४ कोटी घेतले. मात्र २०१६ आणि २०१७ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घातली गेल्याने ब्रावो गुजरात लायन्स संघात सहभागी झाला. इथेही त्याला दोन वर्षे ४ कोटी रुपये मिळाले.
पुढे निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चेन्नई सुपर किंग्जने ब्रावोला २०१८ साठी ६.४ कोटींना विकत घेतले आणि तेव्हापासून २०२१ पर्यंत तो या संघाचा भाग होता. अशाप्रकारे तब्बल १४ हंगाम खोऱ्याने पैसा ओढल्यानंतर आयपीएल २०२२ साठीही ब्रावोने आपले नाव नोंदवले आहे.
ब्रावोव्यतिरिक्त त्याचा संघ सहकारी ख्रिस गेल, एबी डिविलियर्स आणि शॉन मार्श हेदेखील आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते चौदाव्या हंगामापर्यंत या लीगचा भाग होते. परंतु हे तिन्ही परदेशी खेळाडू यंदाच्या हंगामात खेळणार नसल्याने ब्रावोने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: ‘बेबी एबी’नंतर आता दक्षिण आफ्रिकेला मिळाला ‘ज्युनियर रबाडा’, पाहा भेदक गोलंदाजी
‘भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी तो उत्साही होता’, पाँटिंगने सांगितली राज की बात
मेगा लिलावात ‘या’ ५ गोलंदाजांचा गच्च भरणार खिसा; पर्पल पटेलचं मात्र नाव नाही






