वेस्टइंडिज खेळाडू ड्वेन ब्रावो ही वर्णभेदा विरोधी चाललेल्या आंदोलनात सहभागी झाला आहे. त्याने डॅरेन सामी(Darren Sammy) आणि ख्रिस गेल(Chris Gayle) यांच्या पाठोपाठ या विरोधी आवाज उठवला आहे. ब्रावो म्हणाला की, आम्हाला बरोबरी आणि सन्मान मिळाला पाहिजे.
तो पुढे म्हणाला,” खूप झालं आता. अश्वेतवर्णीय लोकांना समानता आणि सन्मान मागायला पाहिजे.”
एका इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान तो म्हणाला, “जगात काय चालू आहे हे पाहून खूप दुःख होत आहे. मी एक अश्वेतवर्णीय माणूस असल्यामुळे इतिहास माहीत आहे, की अश्वेतवर्णीय लोकांबरोबर काय झालं आहे. आम्ही कधीही बदला घेण्याचा विचार करत नाही. आम्ही फक्त सन्मान आणि बरोबरी मागत आहे.”
तो पुढे म्हणाला, “आमच्या बाबतीत प्रत्येक वेळी असं होत असतं. आता बास झालं. आम्हाला सन्मान आणि बरोबरी पाहिजेच. बदला घेण्याचं युद्ध आम्ही कधीही करत नाही. आम्ही दुसऱ्यांना सन्मान देतो. तर मग आमच्या बरोबर असं का होतं.”
“आम्ही प्रेम देणाऱ्या लोकांचं अभिनंदन करतो. आणि हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. आम्हाला फक्त इज्जत दिली पाहिजे.”
वेस्टइंडिजसाठी ४० कसोटी, १६४ वनडे आणि ७१ टी-20 सामने खेळणारा ब्रावो(Dwayne Bravo) म्हणतो की नेल्सन मंडेला(Nelson Mandela), मोहम्मद अली,(Mohammad Ali) माईकल जॉर्डन(Michael Jordan) यांचा उदाहरण देत सांगितलं की “जगाला माहीत पाहिजे, आम्ही किती सुंदर आणि शक्तिशाली आहे”.
काही दिवसांपूर्वी डॅरेन सामी म्हणाला होता की, आयपीएलमध्ये त्याला वेगळ्याचं नावाने बोलावलं जात होतं. तो म्हणाला, भारतात मला काळू म्हणलं गेलं. पण लोकांनी त्याला त्याची जुनी ट्विट दाखवली. ज्यात तो स्वतःला डार्क आणि काळू म्हणत आहे.
इशांत शर्माची(Ishant Sharma) एक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यात सामीला काळू म्हणलं गेलं आहे. हे मस्तीत बोललं गेलं होतं.
ज्याला ६ वर्षानंतर सामीने मुद्दा बनवलं आहे. भारतीय संघात वर्णभेद आणि धर्मावरून कधीही बोललं जात नाही. सामीने आयसीसी(International Cricket Council) आणि जगातील क्रिकेटला रंगभेधा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आग्रह धरला आहे.