एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली होती. पण त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांनी त्यांना पराभूत केले. त्यामुळे चेन्नई हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर विराजमान झाला आहे. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नईचा या हंगामातील चौथा सामना झाला.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवत चेन्नई २ गुणांची आपल्या खात्यात नोंद करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. अशात चेन्नईचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएल २०२०मधील चेन्नई संघाच्या पहिल्या तीनही सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
म्हणून हैदराबादविरुद्धचा सामना ब्रावोचा आयपीएल २०२०मधील पहिलाच सामना ठरणार आहे. या सामन्यात हा धाकड खेळाडू नक्कीच आपली कमाल दाखवताना दिसेल. २००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रावोने चेन्नई संघाकडून आतापर्यंत ९० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २६.४८च्या सरासरीने ९२७ धावा कुटल्या आहेत. एवढेच नव्हे तर, त्याने चेन्नईकडून खेळताना सर्वाधिक १०४ विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रावोव्यतिरिक्त अंबाती रायडूलाही संघात प्लेइंगमध्ये स्थान मिळाले आहे. मुंबईविरुद्धच्या या हंगामातील उद्घाटन सामन्यात रायडूने ७१ धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात रायडूला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. पण आतात दुखापतीतून सावरलेला रायडू हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पुन्हा आपली कमाल दाखवताना दिसेल.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन
शेन वॉटसन, अंबाती रायडू, फाफ डू प्लेसिस, केदार जाधव, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, पियूष चावला, दिपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये खेळलेले २ धुरंधर गाजवतायत परदेशी टी२० लीगचं मैदान, रचली शतकी भागीदारी
‘हा’ माजी क्रिकेटर आता देणार वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षणाचे धडे
“…मैदानात आला आणि आपली प्रतिभा दाखवली”, पोलार्डने ‘या’ भारतीय खेळाडूचे केले कौतुक
ट्रेंडिंग लेख-
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’