वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याला टी२० क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणले जाते. परंतु याच गोलंदाजाने टी२० विश्वचषकासारख्या स्पर्धेत एका चेंडूवर ६ पेक्षा जास्त धावा खर्च करणे अनपेक्षित असते. मात्र ब्रावोने वास्तवात ही नकोशी कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्याने एका चेंडूवर ७ किंवा ८ नव्हे तर चक्क १० धावा दिल्या आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात शारजाह येथे शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला आहे.
तर झाले असे की, वेस्ट इंडिजच्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २० षटकांमध्ये १३९ धावाच करू शकला. यादरम्यान वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने डावातील १२ वे षटक टाकण्यासाठी ड्वेन ब्रावोला बोलवले होते. ब्रावोच्या या षटकातील पहिलाच चेंडू वाईड टाकला आणि बांगलादेशचा फलंदाज लिटन दासने त्यावर चौकार खेचला. अशाप्रकारे ब्रावोच्या पहिल्याच चेंडूवर ५ धावा खर्च झाल्या.
पुढे ब्रावोने पहिलाच चेंडू पुन्हा टाकला आणि हा चेंडूसुद्धा वाईड गेला. योगायोगाने याही चेंडूवर लिटन दासने चौकार ठोकला आणि ब्रावोच्या या एका वैध चेंडूवर तब्बल १० धावा खर्च झाल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने (आयसीसी) ब्रावोच्या या दुर्देवीच्या षटकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अगदी आयसीसीलाही त्याची अशी गोलंदाजी पाहून नवल वाटले आहे.
https://www.instagram.com/reel/CVnS6OkFwhq/?utm_source=ig_web_button_share_sheet
ब्रावोने या सामन्यामध्ये ४ षटके गोलंदाजी करताना ३६ धावा खर्च करत केवळ १ विकेट घेतली. त्याने २ वेळा टाकलेल्या वाईड चेंडूंवर दोन्हीही वेळा चौकार मारणाऱ्या लिटन दासलाच ब्रावोने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. ४४ धावांवर खेळत असलेल्या दासला ब्रावोने एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेसन होल्डरच्या हातून झेलबाद केले. अशाप्रकारे त्याने संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली होती. वेस्ट इंडिजने ३ धावांनी हा सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैवचं अजून काय! ना स्ट्राईक मिळाली ना एकही चेंडू खेळला, तरीही रसेल शून्यावर धाबवाद; पाहा कसं?
पोलार्डने पाडला नवा पायंडा! चालू सामन्यात केले ‘असे’ कृत्य; वाचा सविस्तर






