---Advertisement---

Video: ब्रावोने अडकवला मोठा मासा आपल्या जाळ्यात, विलियम्सनने डीआरएस न घेताच धरली पॅव्हेलियनची वाट

On: शुक्रवार, ऑक्टोबर 1, 2021 1:26 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा ४४ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात देखील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या पदरी निराशाच पडली. अटीतटीच्या लढतीत शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवण्यात यश आले होते. दरम्यान, ड्वेन ब्रावोने सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सनला बाद करत माघारी धाडले होते.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम सनरायझर्स हैदराबाद संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का तेव्हा, बसला जेव्हा ड्वेन ब्रावोने केन विलियम्सनला बाद करत माघारी धाडले होते. ड्वेन ब्रावोने टाकलेला चेंडू केन विलियम्सनला कळालाच नाही आणि टप्प्या पडताच तो जाऊन थेट त्याच्या पॅडला जाऊन धडकला. ड्वेन ब्रावोने जोरदार मागणी केली असता पंचांनी ही त्याला बाद घोषित केले होते.

तर झाले असे की, चेन्नई सुपर किंग्स संघाची गोलंदाजी सुरू असताना ७ वे षटक टाकण्यासाठी ड्वेन ब्रावो गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ड्वेन ब्रावोने केन विलियम्सनला बाद करत माघारी धाडले होते. जेव्हा पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यावेळी केन विलियम्सनने पंचांकडे डीआरएसची मागणी करण्याचा विचार देखील केला नाही. त्याने वृद्धिमान साहा सोबत संवाद साधला आणि लगेचच पॅव्हेलियनचा मार्ग धरला.

या विकेटनंतर ब्रावोने त्याच्या अनोख्या शैलीत सेलिब्रेशन केले. त्याने विलियम्सनला बाद केल्यानंतर डान्स करत सेलिब्रेशन केले.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चेन्नई सुपर किंग्स संघाचा जोरदार विजय 
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. तर अभिषेक शर्मा आणि अब्दुल सामद यांनी प्रत्येकी १८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ४५ आणि फाफ डू प्लेसिसने ४१ धावांची खेळी केली. यासह ६ गडी राखून जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले आहे. त्याचबरोबर प्लेऑफमधील आपले तिकीटही पक्के केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बाबर आझमचा विराटला ठरला भारी! ‘या’बाबतीत कोहलीला मागे टाकत हिटमॅनची केली बरोबरी

मांजरेकरांनी जडेजावर पुन्हा साधला निशाणा; म्हणाले, ‘मी अजूनही त्याच्या फलंदाजीबाबत आश्वस्त नाही’

मंधनाचा ऑस्ट्रेलियाला शतकी तडाखा! ‘हा’ कारनामा करणारी बनली पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---