---Advertisement---

कायरन पोलार्ड हरवला! ब्रावोने केले शोधून देण्याचे आवाहन

On: शुक्रवार, फेब्रुवारी 11, 2022 9:22 PM
bravo
---Advertisement---

वेस्ट इंडीज संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो (dwayne bravo) याने सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्याने त्याचा मित्र कायरन पोलार्ड (kieron pollard) याची मजा घेतली आहे. मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या ब्रावोने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून मीम शेअर करून वेस्ट इंडीजचा कर्णधार पोलार्डची मजा घेतली आहे. पोस्टमध्ये ब्रावोने पोलार्ड गायब झाला असल्याचे म्हटले आहे.

ब्रावोने पोस्ट केकेल्या मीममध्ये पोलार्डाचा फोटो आहे आणि त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये ‘हरवला आहे’ असे लिहिले आहे. खालच्या बाजूला ‘चहलच्या खिशात तो शेवटी दिसला होता,’ असे लिहिले गेले आहे. ब्रावोच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ब्रावोने लिहिले की, खरच हा खूप दुःखद दिवस आहे. माझा मित्र कायरन पोलार्ड कुठेतर हरवला आहे. मित्रांनो तुमच्याकडे जर कसलीही माहिती असेल, तर मला मेसेज करा किंवा पोलिसांकडे माहिती द्या.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार कायरन पोलार्ड युजवेंद्र चहलच्या पहिल्याच चेंडूचा शिकार झाला. त्यानंतर उभय संघातील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात पोलार्ड खेळला नाही. याच पार्श्वभूमीवर ब्रावोने ही पोस्ट केली आहे. अनेक क्रिकेटपटूंनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CZzpMxShzGH/?utm_source=ig_web_copy_link

कायरन पोलार्डनेही ब्रावोच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. कमेंटमध्यो पोलार्डने स्माईलीच्या अनेक इमोजींसोबत “त्याच्यावर प्रेम केले पाहिजे”, असे लिहिले. पोलार्डच्या या कमेंटवर ब्रावो रिप्लाय देत म्हणाला की,  “हे इश्वरा ! तो जिवंत आहे ! देवाचे आभार.” त्याव्यतिरिक्त हरभजन सिंग, धवल कुलकर्णी यांनीही कमेंट करून पोलार्डची मजा घेतली.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकले आहे. भारत २-० अशा आघाडीवर आहे आणि मालिकाही नावावर केली आहे. भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध जिंकलेली ही सलग ११ वी एकदिवसीय मालिका आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘त्याला फक्त थोड्या नशिबाची गरज आहे’; दिग्गजाने केली विराटची पाठराखण

एचपी रॉयल्स, आझम स्पोर्ट्स अकादमी संघांची विजयी आगेकूच

आयपीएल लिलावातील सर्वात रोमांचक नियम सायलेंट टाय ब्रेकर! जाणून घ्या त्याबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---