---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्सची विजयी आगेकुच कायम

On: मंगळवार, जून 11, 2024 7:11 AM
---Advertisement---

पुणे, १० जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत नवव्या दिवशी अर्शिन कुलकर्णी(४१धावा) व मंदार भंडारी(नाबाद २२धावा) यांनी केलेल्या झंझावती अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर ईगल  नाशिक टायटन्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा डकवर्थ लुईस पद्धतीने ९ गडी राखून पराभव करत चौथा विजय नोंदवला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स व रायगड रॉयल्स यांच्यातील सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आज तो दोन्ही संघात प्रत्येकी पाच षटकांचा करण्यात आला.

प्रथम फलंदाजी करताना रायगड रॉयल्स संघाने ५षटकात ३बाद ६४धावा केल्या. यात कर्णधार नौशाद शेखने १३चेंडूत ३चौकार व ३षटकारासह ३१धावा, तर मेहुल पाटीलने १२चेंडूत २चौकारासह नाबाद २२ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. ईगल नाशिक टायटन्स संघाकडून प्रशांत सोळंकी(१-१५), मुकेश चौधरी(१-२६) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

हे आव्हान ईगल नाशिक टायटन्स संघाने ३.५षटकात १बाद ६८धावा केल्या. अर्शिन कुलकर्णीने १५चेंडूत ४१धावांची तुफानी खेळी केली. त्यात त्याने ८चौकार व १षटकार मारला. त्याला मंदार भंडारीने ७चेंडूत २चौकार व २षटकारासह नाबाद २२धावा काढून साथ दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १८चेंडूत ५० धावांची भागीदारी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक:
रायगड रॉयल्स: ५षटकात ३बाद ६४धावा(नौशाद शेख ३१(१३,३×४,३×६), मेहुल पाटील नाबाद २२(१२,२×४), प्रशांत सोळंकी १-१५, मुकेश चौधरी १-२६) पराभुत वि. ईगल नाशिक टायटन्स: ३.५षटकात १बाद ६८धावा(अर्शिन कुलकर्णी ४१(१५,८×४,१×६), मंदार भंडारी नाबाद २२(७,२×४,२×६), तनय संघवी १-१८); सामनावीर – अर्शिन कुलकर्णी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---