---Advertisement---

MPL 2025: ईगल नाशिक टायटन्सचे सामने कुठे आणि कधी? पाहा वेळापत्रक

On: बुधवार, मे 21, 2025 4:10 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 (MPL 2025) स्पर्धेला 4 जूनपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 22 जून रोजी अंतिम सामन्याने संपणार असून, यंदाच्या हंगामात एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत. या लीगचे हे तिसरे हंगाम असून, रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि पीबीजी कोल्हापूर टस्कर्स हे सहा संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. (MPL 2025: Maharashtra Premier League to Begin from 4th June)

या हंगामाची सुरुवात गतविजेता रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. चाहत्यांचे विशेष लक्ष ईगल नाशिक टायटन्स संघावर राहणार आहे. कारण या संघात महाराष्ट्र क्रिकेट गाजवत असलेले शिवाय आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. जसे की प्रशांत सोलंकी, आर्शिन कुलकर्णी आणि मुकेश चाैधरी आदींचा समावेश आहे.

या तिसऱ्या हंगामात प्रत्येक संघ साखळी फेरीत 10 सामने खेळणार आहे. ईगल नाशिक संघाचा पहिला सामना 4 जून रोजी होणार आहे तर, साखळी फेरीतील शेवटचा सामना 19 जून रोजी रंगणार आहे. या दोन्ही सलामी व शेवटच्या सामन्यात नाशिक संघ रत्नागिरी जेट्सची भिडणार आहे. (MPL 2025: Full schedule of Eagle Nashik Titans for Maharashtra Premier League)

स्पर्धेतील क्वॉलीफायर 1 आणि एलिमीनेटर 20 जून रोजी खेळवले जातील, तर क्वॉलीफायर 2 21 जूनला पार पडेल. अंतिम सामना 22 जून रोजी होणार आहे.

ईगल नाशिक टायटन्स संघाचे MPL 2025चे संपूर्ण वेळापत्रक

4 जून, विरुद्ध रत्नागिरी जेट्स, सायंकाळी 7 वाजता
7 जून, विरुद्ध सातारा वाॅरियर्स, सकाळी 9.30 वाजता
9 जून, विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, सकाळी 9.30 वाजता
10 जून, विरुद्ध पुणेरी बाप्पा, सायंकाळी 7 वाजता
12 जून, विरुद्ध रायगड राॅयल्स, सायंकाळी 7 वाजता
13 जून, विरुद्ध सातारा वाॅरियर्स, दुपारी 2 वाजता
15 जून, विरुद्ध पुणेरी बाप्पा, सकाळी 9.30 वाजता
16 जून, विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, दुपारी 2 वाजता
18 जून, विरुद्ध रायगड राॅयल्स, दुपारी 2 वाजता
19 जून, विरुद्ध रत्नागिरी जेट्स, सायंकाळी 7 वाजता

प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश आणि प्रक्षेपणाची सोय
या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सर्व प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

तसेच, हे सामने OTT प्लॅटफॉर्म ‘JioHotstar App’ तसेच ‘Star Sports2’ वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही स्पर्धा अनुभवता येणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioCinema)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---