गोवा| हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मंगळवारच्या (११ जानेवारी) सामन्यात बाम्बोलिनच्या अॅथ्लेटिक स्टेडियमवर मागील तीन सामन्यांत अव्वल संघांना रोखणाऱ्या ईस्ट बंगालविरुद्ध टॉप फोरमध्ये असलेल्या जमशेदपूर एफसीचा कस लागेल.
ईस्ट बंगालला १० सामन्यांतून केवळ ६ गुण मिळवता आलेत. अद्याप आठव्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा असली तरी तळाला असलेल्या या क्लबने मागील काही लढतींमध्ये खेळ उंचावला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई सिटी एफसीला त्यांनी गोलशून्य बरोबरीत समाधान मानायला लावले. अवघ्या एका परदेशी खेळाडूसह खेळताना त्यांनी गतविजेत्यांना गोल करण्यापासून रोखले. डॅनियल चीमा चुकवु याला सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उतरवून सहजासहजी हार मानणार नाही, हे ईस्ट बंगालचे हंगामी प्रशिक्षक रेनेडी सिंग यांनी दाखवून दिले.
जमशेदपूरविरुद्धही ईस्ट बंगालला तीन प्रमुख परदेशी खेळाडूंविना खेळावे लागेल. टॉमिस्लाव मर्सेला आणि फ्रँजो पर्स हे अद्याप दुखापतीतून सावरलेले नाहीत तर आघाडीच्या फळीतील अँटोनिओ पेरोसेविक हा बंदीमुळे एका सामन्याला मुकला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील स्ट्रायकर ग्रेग स्टीवर्ट आणि बचावपटू पीटर हार्टली यांना रोखण्यासाठी रेनेडी यांना भारतीय खेळाडूंवर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.
फुटबॉल हा खेळ आक्रमण आणि बचावाचे मि श्रण आहे. त्यामुळे सांघिक खेळ उंचावणे (कलेक्टिव्ह एफर्ट्स) महत्त्वाचे असते. काही प्रमुख परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंना संधी मिळाली आहे. मंगळवारच्या लढतीत जमशेदपूरविरुद्ध आम्ही सुरुवातीच्या प्लेइंग संघात जास्तीत जास्त भारतीय खेळाडूंसह खेळू. सर्व खेळाडू आमचा विश्वास सार्थ ठरवतील, असा विश्वास रेनेडी यांनी व्यक्त केला आहे.
टॉप फोरमध्ये असलेल्या जमशेदपूरने मागील सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय मिळवत कमबॅक केले. १० सामन्यांत चौथा विजय मिळवत त्यांनी १६ गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थान राखले आहे. मात्र, अव्वल पाच संघांमध्ये केवळ एक-दोन गुणांचा फरक आहे. यावेळचा प्रतिस्पर्धी पॉइंट्स टेबलच्या तुलनेत कमकुवत असला तरी त्यांना गृहित धरून चालणार नाही.
मागील सामन्यातील सातत्य ईस्ट बंगालविरुद्ध कायम राखू, असा विश्वास जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांना वाटतो. विजयासाठी सांघिक कामगिरी महत्त्वपूर्ण असली तरी ऑस्ट्रेलियन फॉरवर्ड जॉर्डन मरे याच्या मागील लढतीतील खेळानंतर आमचे आक्रमण अधिक मजबूत झाले आहे. अर्थात, मागील विजयानंतरही आम्हाला आमच्या खेळात काही सुधारणा करण्याची गरज आहे. तशा सुधारणा करताना आम्ही प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यादृष्टीनेच मैदानात उतरू, असे कॉयल यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मयंकला मागे टाकत ‘विश्वविक्रमी’ एजाज पटेलने पटकावला आयसीसीचा मानाचा पुरस्कार
विजयी भव! केपटाऊन कसोटीत कर्णधार विराटची बॅट ओकणार आग, विजयासाठी टीम इंडियाची तयारी सुरू
हेही पाहा-