---Advertisement---

पहिल्या कसोटीचा हिरो दुसऱ्या कसोटीत ठरला झिरो! लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीतही अव्वल स्थानी

Ebadot Hossain
---Advertisement---

बांगलादेशचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Bangladesh Tour Of New Zealand) असून उभय संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. पहिल्या कसोटीत पाहुण्या बांगलादेशच्या खेळाडूंनी अविश्वसनीय प्रदर्शन करत यजमान न्यूझीलंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला होता. बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला होता त्यांचा, वेगवान गोलंदाज एबादत हुसैन (Ebadot Hossain). पण आता याच हुसैनने उभय संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत लाजिरवाणा विक्रम (Ebadot Hossain’s  Duck Record) केला आहे. 

ख्राईस्टचर्चच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना (Second Test) सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने कर्णधार टॉम लॅथमच्या द्विशतकाच्या जोरावर ५२१ धावा फलकावर आहेत. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचे फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. बांगलादेशकडून केवळ यासिर अली (५५ धावा) आणि नुरुल हसन (४१ धावा) यांना दोन आकडी धावा करता आल्या.

व्हिडिओ पाहा-

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

बांगलादेशकडून या डावात एकेरी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हुसैनचा समावेश आहे. ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत तो डावाखेर नाबाद राहिला. परंतु २ चेंडूंचा सामना करताना त्याला एकही धाव करता आली नाही. यासह पुन्हा एकदा त्याच्या खात्यात शून्य धावांची (डक) भर पडली. हुसैनने कसोटी डावात खाते न खोलण्याची ही पहिलीवहिली नसून तब्बल १० वी वेळ होती. अर्थातच यापूर्वीच्या ९ कसोटी डावांमध्ये तो शून्य धावांवर पव्हेलियनला परतला आहे.

यासह हुसैन सर्वाधिक कसोटी डावात खाते न खोलणाऱ्या नकोशा विक्रमाच्या यादीत (Most consecutive scoreless Test innings)
अव्वलस्थानी पोहोचला आहे. त्याच्यापूर्वी न्यूझीलंडचे ख्रिस मार्टिन आणि श्रीलंकेचे लहिरू कुमारा सलग ९ कसोटी डावांमध्ये शून्य धावा करत या यादीत संयुक्तपणे प्रथमस्थानी होते. परंतु आता हुसैनने त्यांना मागे सोडले आहे.

याखेरीज दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजीतही तो विशेष योगदान देऊ शकला नाही. या डावात ३० षटके गोलंदाजी करताना तब्बल १४३ धावा देत त्याला फक्त २ विकेट्स घेता आल्या आहेत.

हेही वाचा- एकेकाळी एअर फोर्ससाठी खेळायचा व्हॉलीबॉल आता क्रिकेटर बनून बांगलादेशला मिळवून दिला ऐतिहासिक विजय

पहिल्या सामन्यात हुसैनने पटकावलेला सामनावीर पुरस्कार
याउलट न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मात्र हुसैनने आपल्या भेदकतेपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली होती. या सामन्यातील पहिल्या डावात १८ षटके गोलंदाजी करताना त्याला फक्त १ विकेट घेता आली होती. परंतु दुसऱ्या डावात मात्र त्याने २१ षटकांमध्ये ६ फलंदाजांचा तंबूचा रस्ता दाखवला होता. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोविडच्या वाढत्या समस्येमुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा फक्त महाराष्ट्रात भरवण्याचा बीसीसीआयचा विचार : रिपोर्ट

ब्रेकिंग! प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दिलासा, ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील केस जिंकली

विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’

हेही पाहा- 

जोहान्सबर्ग कसोटी तर गमवलीच, पण भारतीय खेळाडूंनी वाद घालत सामन्याला लावल गालबोट | INDvsSA Clashes

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---