इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड(ईसीबी) इंग्लंड संघातील खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत. कोरोनाच्या महामारी नंतर पुन्हा क्रिकेट सामन्याचे आयोजन होवू लागले. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना जास्ती जास्त वेळ जैव सुरक्षित वातावरणात घालवावा लागला.
इंग्लंड हा देश कोरोना व्हायरसच्या विश्रांती नंतर जुलैमध्ये क्रिकेटला पुन्हा सुरूवात करणारा पहिला देश होता. इंग्लंड संघाने वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघा सोबत सामने खेळले होते.त्यांनंतर काही खेळाडूनी यूएईत आयपीएल स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाले होते.
या महिन्यात ईसीबीचे व्यवस्थापकीय संचालक एॅश्ले जाइल्स म्हणाले होते की खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली जाईल. त्यानंतरच संघ पुढील दौऱ्यासाठी जाईल. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, “एॅश्ले संघासाठी मानसिक आरोग्यशी निगडित व्यक्तिला नियुक्त करण्याच्या तयारीत आहेत. हे मनोविज्ञान आणि उपचार यांच्यापेक्षा वेगळे असणार आहे. परंतु खरे तर स्थायी रूपाने आमच्या हाय परफॉर्मन्सच्या भागानुसार मानसिकतेला चांगल्या प्रकारे बघेल. आम्ही संघात नवीन नेतृत्वकर्ता तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, इंग्लंड संघाचा विश्वचविजेता कर्णधार इयान मॉर्गन आणि इतर बर्याच खेळाडूंनी मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची गरज असे असे म्हणले आहेत. कारण खेळाडू कोरोना महामारीच्या काळात दौरे करत आहेत. इंग्लंड दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी दौर्यावर जाणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात 4 कसोटी, 5 टी-20 आणि 3 वनडे खेळण्यासाठी भारताच्या दौर्यावर येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत
– SA vs SL: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी