भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना ऑस्ट्रेलिया संघाला 8 विकेट्सने धूळ चारली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी खूपच निराशाजनक होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने ऑस्ट्रेलिया फलंदाजांवर सडकून टीका केली.
रिकी पॉंटिंगने ऑस्ट्रेलिया संघाच्या खराब कामगिरीवर बोलताना फलंदाजांवर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे संघाचा पराभव झाला. अपयशापासून वाचण्यासाठी बाद होण्याची भिती दूर घालवावी लागेल. भारतीय संघ एॅडलेडमध्ये 36 धावांवर बाद झाला होता. मात्र या सामन्यात त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन जोरदार मुसंडी मारली आणि विजय संपादन केला.
पॉंटिंग म्हणाला, “ऑस्ट्रेलिया संघाने तिथे (एॅडलेड) 191 आणि येथे 195 व 200 धावा केल्या. ही कसोटी क्रिकेटमधील फलंदाजी नाही. मला काळजी आहे की, त्यांना या धावा करायला त्यांना खूप वेळ लागला. हा माझा मुख्य मुद्दा आहे. त्यांना जिगर दाखवावा लागेल. ते बाद होण्यापासून घाबरू शकत नाहीत. त्यांनी निर्भय होवून खेळपट्टीवर उतरून धावा करायला पाहिजेत आणि त्यांनी या धावा 2.5 धावा प्रती षटकाच्या दरा पेक्षा अधिक वेगाने करायला पाहिजेत. ”
माजी कर्णधार पॉंटिंगन म्हणाला, “त्यांनी मेलबर्न आणि एॅडलेडमध्ये 2.5 धावा प्रती षटक या दराने धावा केल्या आहेत. त्यांनी भारता विरुद्ध मागील मालिकेत सुद्धा असेच केले होते आणि तेव्हा पराभूत झाले होते. मला वाटते त्यांनी खेळण्याच्या आपल्या पद्धतीवर लक्ष देण्याची गरज आहे.”
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सर्वबाद 195 धावसंख्या केली होती. त्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 326 धावा केल्या. त्यांनतर ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या डावात सर्वबाद 200 धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य दिले होते. ते भारतीय संघाने आपल्या दुसर्या डावात 2 गडी गमावून पूर्ण केले. त्याचबरोबर या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाने या मालिकेत बरोबरी केली.
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– SA vs SL: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत