---Advertisement---

अरेरे! न्यूझीलंडनंतर आणखी एक देश पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या तयारीत

On: शनिवार, सप्टेंबर 18, 2021 12:39 AM
pak
---Advertisement---

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव अखेरच्या क्षणी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दौऱ्यावरील पहिला वनडे सामना सुरू होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना न्‍यूझीलंड संघाने दौऱ्यातून माघार घेतली. पाकिस्तान क्रिकेटसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याबरोबर आता आणखी एक देश आपला आगामी पाकिस्तान दौरा रद्द करू शकतो.

हा संघ घेऊ शकतो माघार
न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानमधून काढता पाय घेतल्याने आता इतर बोर्डांचे धाबे देखील दणाणले आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आपल्या आगामी पाकिस्तान दौर्याविषयी महत्वपूर्ण व्यक्तव्य केले. ईसीबीने एक निवेदन जाहीर करताना म्हटले,
‘सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याच्या निर्णयाची आम्हाला माहिती आहे. पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्याआमच्या सुरक्षा पथकाशी आम्ही सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संपर्क साधत आहोत. ईसीबी पुढील २४ ते ४८ तासांमध्ये निर्णय घेईल की आमचा दौरा वेळापत्रकानुसार पुढे जाईल की नाही.’

असा नियोजित आहे इंग्लंडचा पाकिस्तान दौरा
जगभरातील सर्व अव्वल क्रिकेटपटू आयपीएलमध्ये व्यस्त असताना ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा दौरा करेल. या दौऱ्यामध्ये इंग्लंड दोन टी२० सामने खेळेल. हे सामने १३ व १४ ऑक्टोंबर रोजी रावळपिंडी येथे होतील. विश्वचषकाच्या दृष्टीने उभय संघांसाठी हा चांगला सराव ठरेल.

हे देश करणार भविष्यात पाकिस्तानचा दौरा
वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यात तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळली जाईल. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळण्यासाठी येईल. न्यूझीलंडने दौरा रद्द करणे हा पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी मोठा धक्का आहे. पाकिस्तान सुपर लीग आणि काही देशांच्या दौऱ्यांमुळे पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले होते. परंतु, प्रमुख कसोटी देशांनी बऱ्याच काळापासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड

यंदा विराटसाठी ‘आर या पार’ स्थिती! फेल झाल्यास आरसीबीच्या कर्णधारपदावरुन होऊ शकते हाकालपट्टी

न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---