---Advertisement---

10 षटकात 250 धावा… दोघांनी ठोकली शतकं..!! अशी फलंदाजी स्वप्नातही पाहिली नसेल

On: बुधवार, जुलै 17, 2024 2:47 PM
---Advertisement---

ज्यांना वाटतं टी20 क्रिकेटमध्ये 250 म्हणजे खूप मोठी धावसंख्या झाली, अशांसाठी आम्ही ही बातमी घेऊन आलो आहोत. हंगेरीमध्ये खेळल्या गेलेल्या टी10 स्पर्धेतील एका सामन्यात एका संघानं 10 षटकांत तब्बल 257 धावा ठोकल्या! या सामन्याच्या एका डावात एक नव्हे तर चक्क दोन फलंदाजांनी शतकं ठोकली!

हंगेरीमध्ये खेळल्या जात असलेल्या ECS हंगेरी 2024 टी10 क्रिकेट स्पर्धेत ही घटना घडली. स्पर्धेतील कोब्रा क्रिकेट क्लबनं रॉयल ईगलविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 2 गडी गमावून 257 धावा केल्या. प्रत्युत्तरात, लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल ईगल संघाला 8 बाद केवळ 98 धावाच करता आल्या. अशाप्रकारे कोब्रा क्लबनं हा सामना 158 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.

16 जुलै रोजी ECS हंगेरी 2024 टी10 स्पर्धेत हा सामना खेळला गेला. कोब्रा क्रिकेट क्लबनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर जेरेमी पोलारुथुनं नाबाद शतक झळकावलं. पहिली विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार शेख रसिकनंही झंझावाती शतक झळकावलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद बुरहाननं अवघ्या 8 चेंडूत 30 धावा ठोकल्या. 10 षटकांच्या सामन्यात कोब्रा क्रिकेट क्लबनं 2 गडी गमावून 257 धावा केल्या.

कोब्रा क्रिकेट क्लबसाठी कर्णधार शेख रसिक आणि जेरेमी पोलारुथु यांनी दमदार खेळी केली. या दोघांनी मिळून एकूण 55 चेंडूंचा सामना केला आणि 14 चौकार आणि 23 षटकार खेचत 207 धावा केल्या. जेरेमी पोलारुथूनं 31 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीनं 101 धावांची नाबाद खेळी खेळली. तर कर्णधार रसिकनं केवळ 24 चेंडूत 13 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं 106 धावा ठोकल्या.

कोब्रा क्लबच्या डावात एकूण 27 षटकार आणि 14 चौकार मारले गेले. सलामीला आलेला नीलेश जैन पहिल्याच चेंडूवर खातं न उघडता बाद झाला. त्यानंतर मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. जेरेमी पोलारुथूनं 325, कर्णधार रसिकनं 441 आणि बुरहाननं 375 च्या स्ट्राइक रेटनं गोलंदाजांची सफाई केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणाची संधी! फक्त करावं लागेल हे काम
टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या
मोठ्या मनाचा मोठा खेळाडू! सामनावीर पुरस्कार केला चाहत्याला भेट; VIDEO एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---